वर्ल्ड क्रिप्टो मार्केटमध्ये आज मंगळवारी 13 डिसेंबर 2022 रोजी तेजी दिसून आली. बिटकॉइनचा भाव पुन्हा 17000 डॉलरवर गेला. एक्सआरपी, पॉलीगॉन, लिट्टेकॉइन या क्रिप्टो करन्सींच्या किंमतीत वाढ झाली.
FTX एक्सचेंज घोटाळ्याप्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. FTX चा संस्थापक आणि माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेडला अखेर बहामाजमधून अटक करण्यात आली आहे. रॉयल बहामाज पोलिसांनी सॅम बँकमन फ्रेडला अटक केली. त्याने दोन क्रिप्टो चलनांमध्ये अफरातफर केल्याचे तपासाता आढळून आले आहे. या घडामोडींचे पडसाद आज क्रिप्टो मार्केटवर उमटले.
ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केटची उलाढाल मागील 24 तासांत 847.81 बिलियन डॉलर्स इतकी होती. त्यात 1% वाढ झाली. एकूण उलाढाल 15% ने वाढली असून ती 33.47 बिलियन डॉलर इतकी होती.
कॉइनमार्केटकॅपनुसार सध्या बिटकॉइनचा भाव 17454.41 डॉलर इतका आहे. त्यात मागील 24 तासांत 2.96% वाढ झाली. इथेरियमचा भाव 1294.02 डॉलर इतका असून त्यात 3.66% वाढ झाली. तिथेरचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. बीएनबी कॉइनच्या किंमतीत 3.15% घसरण झाली आहे. बीएनबी कॉइनचा भाव 267.17 डॉलर इतका आहे.
यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर असून बायनान्स यूएसडी कॉइनचा भाव 0.99 डॉलर इतका आहे. एक्सआरपीचा भाव 0.38 डॉलर असून डॉजकॉइनचा भाव 0.90 डॉलर आहे. कार्डानो कॉइनच्या किंमतीत 1.27% वाढ झाली आहे. कार्डानो कॉइनचा भाव 0.30 डॉलर इतका आहे. पोलकाडॉटचा भाव 5.17 डॉलर इतका आहे. लिटेकॉइनचा भाव 76.73 डॉलर इतका आहे.