आजकाल बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood Industry) बिग बजेट चित्रपटांमध्ये अनेकदा आयटम सॉंग पहायला मिळतात. चित्रपट चालावा किंवा हिट ठरावा हे कारण त्यामागे असते. चांगल्या स्टारकास्ट असलेल्या चित्रपटावर चित्रपटाचे निर्माते 100 ते 150 कोटी रुपये खर्च करतात, मात्र आता चित्रपटाचे निर्माते चित्रपटातील गाण्यांवरही करोडो रुपये खर्च करण्यास तयार असतात. त्यांना माहीत असते की चित्रपटातील गाणी हिट झाल्यानंतर चित्रपट हिट ठरु शकतो. यामुळेच चित्रपटांचे निर्माते आता चित्रपटांच्या गाण्यांसाठी काही मिनिटांचे आयटम नंबर करणाऱ्या नायिकांनाही (Bollywood Actress Income) करोडो रुपये देण्यास तयार होतात. आज आपण बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा गाण्यांबद्दल माहिती करुन घेऊया ज्यांना बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले.
Table of contents [Show]
पार्टी ऑल नाईट, चित्रपट - बॉस
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ब्लॉकबस्टर फिल्म बॉसमधील पार्टी ऑल नाईट गाणे आजही लोकांच्या पसंतीचे आहे. आजही हे गाणे वाजताच तरुणाई थिरकू लागते. हे गाणे संगीत आणि पार्टी प्रेमींना खूप आवडते. या गाण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च आला होता. या गाण्यात 600 हून अधिक परदेशी मॉडेल्सने नृत्य केले आहे.
गाणे- मलंग, चित्रपट- धूम-3
'धूम-3' मधील ‘मलंग’ या गाण्याची सुद्धा गणना बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या गाण्यांमध्ये होते. या गाण्यातील आमिर खान आणि कतरिना कैफचे नृत्य सर्वांना खूप आवडले. हे गाणे बनवण्यासाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला होता. या गाण्यातील परदेशी नर्तकांना जास्त फी देण्यात आली होती.
गाणे- सुंदरिये, फिल्म- 2.0
चित्रपट 2.0 चे सुंदरिये हे गाणे ब्लॉकबस्टर ठरले. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. हे गाणे शूट करण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यामुळेच हे गाणे भारतीय चित्रपटातील सर्वात महागडे गाणे ठरले. या गाण्यात साऊथचा सुपरस्टार रजनीकांत दिसला होता.
गाणे- ओ अंतवा, चित्रपट- पुष्पा
'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'ओ अंतवा' हे सर्वात लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि समंथा यांची केमिस्ट्री लोकांना आवडली. त्याचबरोबर या गाण्यात सामंथाचा हॉट लूकही चांगलाच दिसत होता. समांथाच्या या आयटम नंबरने सर्व दर्शकांना पडद्यावर खिळवून ठेवले.
गाणे- छमक छल्लो, चित्रपट - रा वन
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या रा वन या चित्रपटातील छमक छल्लो हे गाणेही त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले होते. हे गाणे बनवण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे या गाण्यात भरपूर VFX वापरण्यात आले होते. यामागे निर्मात्याने खूप पैसा खर्च केला होता.
गाणे- राम चाहे लीला
राम चाहे लीला या गाण्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉट लूकमध्ये दिसली होती. या गाण्यात प्रियांका चोप्राचा परफॉर्मन्स पाहून सगळेच तिच्या सौंदर्याचे वेडे झाले. या गाण्याच्या शूटिंगसाठी एकूण 6 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता.