Bollywood celebrities invested in Startups: गेल्या काही वर्षांत भारतीय स्टार्टअपची इकोसिस्टीम (Startup Ecosystem) वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष स्टार्टअपकडे आकर्षित होत आहे. मग बॉलिवुड (Bollywood) मागे कसे राहिल, मागील काही वर्षांपासून सेलिब्रेटी स्टार्टअपमध्ये गुंतवणुकदार (Investors in Startups) बनत आहेत.
यंदाच्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये कलाकारांनी गुतवणुकीसाठी डीटूसी स्टार्टअपना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. तर आपण पाहुया, कोणत्या सेलिब्रेटीने, कोणत्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
अनुष्का शर्मा: या अभिनेत्रीने एप्रिल 2022 मध्ये दोन रिटेल हेल्थ फूड सेक्टरमधील डी टू सी अर्थात डायरेक्ट टू कन्ज्युमर स्टार्टअप स्लर्प आणि ब्लू ट्राईब या दोघांमध्ये केले असून स्लर्प फार्मची ब्रँड अम्बॅसेडरही (सदिच्छा दूत) आहे.
स्लर्प फार्म या स्टार्टअपची सुरुवात 2016 मध्ये मेघना नारायण आणि शौर्वी मलिक यांनी केली. हे स्टार्टअप हेल्थी स्नॅक्सचे उत्पादन करते. तृणधान्यांपासून नूडल्स, पास्ता, सिरीयल आदी त्यांचे प्रोडक्ट आहेत. तर, ब्लू ट्राइब ही कंपनी संदीप सिंह आणि निक्की अरोरा सिंह यांनी 2019 मध्ये सुरू केली. यात प्लांट बेस्ड मीटचे उत्पादन केले जाते.
रणवीर सिंह: या अभिनेत्या सप्टेंबर 2022 मध्ये शार्क टँक इंडिया फेम विनीता सिंह यांच्या शुगर कॉस्मॅटीक्स कॉस्मेटिक्समध्ये गुंतवणूक केली. तर, कराराचा एक भाग म्हणून, रणवीरला ब्रँड फेसम्हणूनही सामील केले गेले.
2015 मध्ये विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांनी हे स्टार्टअप सुरू केले होते. मिड रेंज प्राईज सौदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या या कंपनीची 1 हजार 750 ब्रँड आऊटलेट आहेत. 2021 वर्षात कंपनीचा महसूल 127.8 कोटी एवढे जमा झाले होते.
शिल्पा शेट्टी: या अभिनेत्री 2022 वर्षात चार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. अपस्किलिंग प्लॅटफॉर्म हुनर, डी टू सी ब्रँड मामाअर्थ, न्यूट्रास्युटिकल स्टार्टअप फास्ट अँड अप आणि चिकन्युट्रीक्स यांच्या गुंतवणुकदार बनली आहे.
निष्ठा योगेश यांनी 2018 मध्ये हुनर कोर्सेस हे स्टार्टअप सुरु केले. ही हैद्राबादची कंपनी स्किल्स ऑनलाईन आणि ऑफलाईन स्किल्स कोर्सेस घेतात. तर, मामाअर्थ ही स्टार्टअपमधली युनिकॉर्न कंपनी आहे. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जी शेअर बाजारात लिस्टेड नसून, त्या कंपनीचे मूल्य 1 अब्ज आहे. ही कंपनी 2016 साली गझल अलग आणि वरुण अलग यांनी सुरु केली होती. यात लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी टॉक्सिन फ्री स्किनकेअर प्रोडक्ट बनवतात.
फास्ट अँड अप हे स्टार्टअप स्टोर्ट्स न्युट्रीशन सप्लिमेंटचे उत्पादन करते. ही कंपनी 2015 साली विजयराघवन यांनी सुरु केली होती. तर, चिकन्युट्रीक्स हीदेखील हेल्थ सप्लिमेंट बनवणारी कंपनी आहे, ही विशेषत: स्किन, हेअरसाठी सप्लिमेंट बनवतात. ही कंपनी शिल्पा खन्ना - ठक्कर यांनी 2011 साली सुरू केली होती.
अथिया शेट्टी: या अभिनेत्रीने मार्चमध्ये 2022 मध्ये फॅशन ई कॉमर्स स्टार्टअप स्टेज थ्रीमध्ये गुंतवणूक केली आहे. या कराराचा भाग म्हणून, ती स्टार्टअपमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणूनही सामील झाली. सबेना पुरी, संचित बावेजा आणि रिना ढाका यांनी 2016 मध्ये हे स्टार्टअप सुरु केले. या प्लॅटफॉर्मवर फॅशन पोशाख, दागिने विकले जातात.
दिया मिर्झा: या अभिनेत्रीने सप्टेंबर 2022 मध्ये सस्टेनेबल बेबी क्लोदिंग ब्रँड ग्रीनडिगोलामध्ये गुंतवणूक केली असून ती ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ब्रँडचा प्रचार करत आहे. बरखा भटनागर दास आणि मेघना किशोर यांनी 2019 मध्ये ग्रीनडीगो हे स्टार्टअप सुरू केले. ही कंपनी लहान मुलांसाठीचे कार्बन-न्यूट्रल कपड्यांची विक्री करते.
काजल अग्रवाल: या अभिनेत्री नोव्हेंबर 2022 मध्ये द आयुर्वेदीक कं या डी टू सी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. परम भार्गव आणि श्रीधा सिंग यांनी 2021 मध्ये हे स्टार्टअप सुरू केले. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे, सप्लिमेंट, स्किनकेअर, हेअरकेअर आणि नैसर्गिक मेकअप आदींचे उत्पादन आणि विक्री करतात.
नोरा फतेही: या अभिनेत्रीने जुलै 2022 मध्ये क्लाउड किचन एग्रीगेटर क्युअरफूड्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यासह या कंपनीची उपकंपनी केकझोनची ब्रँड अम्बॅसेडर बनली आहे. अंकित नागोरी यांनी 2020 मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली. या कंपनीअंतर्गत त्यांनी ईटफिट, शरीफ भाई, अलीगढ हाऊस बिर्याणी आणि केकझोन यांसारखे ब्रँड डेव्हल्प केले आहेत. त्यांनी 15 शहरांमध्ये 150 पेक्षा जास्त क्लाउड किचन उभारले आहेत.
पंकज त्रिपाठी: या वेबसिरीज फेम अभिनेत्याने अॅग्रीटेक स्टार्टअप कृषी नेटवर्कमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच ते या कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडरही बनले आहेत. आदित्य आणि संजय अग्रवाल या पिता-पुत्राने 2015 मध्ये याची स्थापन केली. या कृषी नेटवर्कद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो.
रकुल प्रीत सिंह: एप्रिल 2022 मध्ये या अभिनेत्रीने डीटूसी न्यूट्रास्युटिकल स्टार्टअप वेलबीइंग न्यूट्रिशनमध्ये गुंतवणूक केली असून, यांची ब्रँड अम्बॅसेडरही बनली आहे. अवनीश छाब्रिया यांनी 2019 मध्ये या कंपनीची सुरुवात केली. ही कंपनी व्हिटॅमिन आणि मिनरल्स सप्लिमेंट्स त्यांच्या वेबसाइटवर आणि ऑफलाइन स्टोअरद्वारे विकतात.
रश्मिका मन्डान्ना: या पुष्पाफेम अभिनेत्रीने डीटूसी व्हिगन ब्रँड प्लममध्ये जून 2022 मध्ये गुंतवणूक केली आणि ब्रँड अम्बॅसेडर म्हणून प्रचारही करत आहे. शंकर प्रसाद यांनी 2013 मध्ये प्लमची सुरुवात केली. ही कंपनी व्हिगन सौंदर्यरप्रसाधने अर्थात स्किनकेअर, हेअरकेअ, पर्सनल केअर, मेकअप आदींचे उत्पादन आणि विक्री करते.
सारा अली खान: मार्च 2022 मध्ये या अभिनेत्रीने डीटूसी स्टार्टअप द सोल्ड स्टोअर मध्ये गुंतवणूक केली. 2013 मध्ये वेदांग पटेल, हर्ष लाल, आदित्य शर्मा आणि रोहीन समताने यांनी हा क्वर्की ब्रँड स्थापित केला. यात कॅज्युअल वेअर आणि पॉप-कल्चर कपडे जसे की टॉप वेअर, बॉटम वेअर, इनरवेअर आणि ऍक्टिव्हवेअर विकले जातात.
टायगर श्रॉफ: या बॉलिवूड अभिनेत्याने जानेवारीमध्ये एडटेक स्टार्टअप फ्रेडमच्या गुंतवणूक केली. कविश गाडिया आणि निखिल सराफ यांनी 2016 मध्ये यास सुरुवात केली होती. हे स्टार्टअप मुलांना इंग्रजी भाषा शिकण्यास मदत करण्यासाठी एआय (Artificial Intelligence) आणि डेटा सायन्स वापरते.
सुनिल शेट्टी: या बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याने गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअप्समध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करत आहेत. गेल्या तीन वर्षांत पाच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. तर 2022 मध्ये अॅक्वटीन (Aquatein) आणि पुरुष-केंद्रित ज्वेलरी ब्रँड मेटामॅन (MetaMan) मध्ये गुंतवणूक केली आहे. अनिल शेट्टी यांनी 2022 मध्ये मेटामॅनी सुरुवात केली. यात पुरुषांचे ब्रेसलेट, पेंडेंट - चेन, कानातले आणि अंगठ्या आदींची विक्री होते. तर, अॅक्वेटीन या फिटनेस ब्रँडची सुरुवात अनंता प्रभाला यांनी 2019 मध्ये केली. ही कंपनी प्रोटीनयुक्त हेल्थी ड्रिंक्सची विक्री करते.