Cricket Fantasy App:गेल्या काही वर्षात फॅन्टॅसी क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याची सुरूवात भारतातील सर्वांत पहिली फॅन्टॅसी क्रिकेट साईट ड्रीम 11 (Dream 11)ने केली. या गेमिंग ॲपने खूप कमी कालावधीत नवनवीन युझर्स मिळवले आहेत आणि अजूनही बऱ्याच जणांना याचे आकर्षण आहे. नुकत्यात झालेल्या आयपीएल लीगमध्ये Dream 11 ची जादू दिसून आली. कोट्यवधींच्या बक्षिसांमुळे क्रिकेट फॅन्टॅसी ॲपची तरुणांमध्ये नेहमीच जोरदार चर्चा असते.
Dream 11 हे एकमेव फॅन्टॅसी क्रिकेट ॲप नाही. अशाप्रकारची बरीच ॲप आहेत. ज्यावर क्रिकेटप्रेमींना टीम लावता येते. पैसे जिंकता येतात. सध्याच्या घडीला भारतात जवळपास 100 हून अधिक असे ॲप आहेत. जिथे तुम्ही फॅन्टॅसी क्रिकेट खेळू शकता आणि त्यातून हजारो रुपये जिंकू शकता. आज आपण अशाच वेगवेगळ्या फॅन्टॅसी क्रिकेट ॲपबद्दल आणि या गेमिंग इंडस्ट्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
क्रिकेट हा भारतातल्या गल्लीबोळात खेळला जाणारा खेळ आहे. पूर्वी दर 4 वर्षांनी वर्ल्ड कप खेळला जात होता. तो पाहण्याची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आता दरवर्षी आयपीएलचे सामने होत आहेत. म्हणजे टीव्ही क्रिकेट पाहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात आता पुढचे पाऊल टाकत क्रिकेट या खेळाने डिजिटल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे आणि यासाठी बऱ्याच कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यांना हातात बॅट घ्यायला देखील आवडत नाही. ते आज Dream 11 वर स्वत:च्या टीम बनवत आहेत. त्यातून पैसे कमवत आहेत. फॅन्टॅसी गेमचे हे गारूड तरुणांमध्ये इतके भिनले आहे की, त्याची मोजदाद नाही.
ड्रीम 11 च्या सक्सेसफुल इनिंगनंतर सध्या मार्केटमध्ये फॅन्टॅसी गेमची बरीच ॲप आली आहेत. या ॲपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळून पैसे मिळत आहेत. पण फक्त क्रिकेटचा विचार केला तर सुमारे 100 हून अधिक फॅन्टॅसी क्रिकेट ॲप्स बाजारात आली आहेत. यामध्ये Vision11, OneTo11, FSL11, Sportasy, 11Sixes, PlayerzPot, 11 Challengers, Sixer Fantasy App, Gamezy आणि IGamio हे काही मोजके फॅन्टॅसी क्रिकेट ॲप आहेत. ज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
फॅन्टॅसी क्रिकेट हा आता फक्त तरुणांच्या आकर्षणाचा विषय राहिलेला नाही. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह वृद्धही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागले आहेत. या अशा गेमिंग ॲपमुळे अनेकांची आर्थिक फसवणूकदेखील झाली आहे. त्यामुळे असे ॲप वापरताना त्याचे व्यसन लागणार नाही आणि आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.