सध्या सर्वच बँकांकडून ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Credit and Debit Card) दिले जाते. तुम्हीही या कार्डचा वापर करत असाल, तर त्याचा पिन अपडेट केलाच असेल. जर तो केला नसेल, तर ही चांगली सवय नाही. चुकूनही तुमच्या सिक्युरिटी पिनमध्ये (Security PIN) कोणी छेडछाड केली, तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. त्यामुळे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा सिक्युरिटी पिन दर तीन महिन्यांनी अपडेट करणे गरजेचे आहे.
आपण अनेक ठिकाणी खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतो. ज्यामुळे हॅकर्सला आपला पिन मिळवणे अधिक सोपे जाते. तुम्हाला हॅकर्सपासून वाचायचे असेल, तर तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.
सिक्युरिटी पिनच्या सुरक्षिततेसाठी 'या' टिप्स नक्की फॉलो करा
तुम्ही तुमचा सिक्युरिटी पिन इतर पिनसारखा जनरल ठेवू नका. हा पिन तयार करताना खूप स्पष्ट असलेला नंबर सेट करू नका. बरेच लोक त्यांचा पासवर्ड 1234 किंवा 0000 असा ठेवतात. ही चूक करणे टाळा. यामुळे हॅकर सहज तुमचा पिन हॅक करून घोटाळा करू शकतात.
तुमचा कार्ड पिन जितका युनिक असेल, तितकी तुमच्या कार्डची सुरक्षा वाढेल. तुम्ही पासवर्ड तयार करताना शब्द आणि संख्यांचा वापर एकत्र करून पासवर्ड तयार करू शकता. याशिवाय पिन जेवढा मोठा तितका तो क्रॅक करणे हॅकरसाठी अवघड असेल. आपण आपल्या सोयीसाठी साधा सोपा पिन सेट करतो. मात्र त्यामुळे आपली सुरक्षितता धोक्यात येते.
अनेकजण पिन लक्षात राहत नाही म्हणून तो कार्डवर लिहितात. मात्र तसे करू नका. जर तुमचे कार्ड चोरीला गेले, तर हॅकर्स किंवा चोर सहज चोरी करू शकतात. याशिवाय तुमचा पासवर्ड तुम्ही तुमच्याशिवाय इतर कोणाशीही शेअर करू नका.
गर्दीच्या ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळा. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्याची सवय असेल, तर सुरक्षिततेसाठी पिन सोबत फिंगरप्रिंट अनलॉक देखील सेट करा. तुमच्या कार्डचा तपशील विचारणाऱ्यांपासून तुमचे ईमेल किंवा बँकिंग मेसेज लांब ठेवा.
Source: hindi.financialexpress.com