Air India Offer: शॉपिंग स्टोअर टाटा न्यू आणि एचडीएफसी बँकेकडून खास क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काउंट दिला जातो. या कार्डमध्ये आता एअर इंडियानेही भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना एअर इंडियाचे तिकिट स्वस्तात मिळेल तसेच शॉपिंग ऑफर्सही पदरात पाडून घेता येतील.
टाटा डिजिटलने याबाबत अधिकृत माहिती दिली. बाजारात अनेक ब्रँड्स बँकांसोबत मिळून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणतात. त्याद्वारे ग्राहकांना अतिरिक्त डिस्काउंट मिळतो. टाटाने एचडीएफसी बँकेसोबत मिळून को-ब्रँडेड कार्ड आणले आहे.
क्रेडिट कार्डचा फायदा काय?
एअर इंडियाच्या संकेतस्थळावरून आणि अॅपवरुन तिकिट बुक करणाऱ्या ग्राहकांना “Neu Coins” मिळतील. टाटा न्यू इन्फिनिटी क्रेडिट कार्डद्वारे तिकिट बुक केल्यास 5% न्यू कॉइन्स मिळतील. तर टाटा न्यू प्लस एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे तिकिट बुक केल्यास 2% न्यू कॉइन्स मिळतील.
देशांतर्गत आणि परदेशी विमानतळावर मोफत लाउंज अॅक्सेस मिळेल. न्यू कॉइन्स सोबतच क्रेडिट कार्डद्वारे तिकिट बुक करणाऱ्या ग्राहकांना “Flying Return” पॉइंट्सही मिळतील.
न्यू कॉइन्स सर्व प्रकारच्या शॉपिंगवर
या क्रेडिट कार्डद्वारे टाटा न्यू स्टोअरमधून किंवा ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना न्यू कॉइन्स मिळतील. 1 न्यू कॉइन म्हणजे 1 रुपया. Tata Neu आणि टाटा ब्रँड पार्टनर सोडून इतर ठिकाणांवरून शॉपिंग केल्यास एकूण खरेदीच्या 1% किंवा 1.5% न्यू कॉइन्स मिळतील. रुपे क्रेडिट कार्डद्वारे केलेले UPI पेमेंटवरही रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
शॉपिंगसाठी वापरता येतील कॉइन्स
शॉपिंगवर मिळालेले न्यू कॉइन्स ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, ट्रॅव्हल तिकिट, हॉटेल, किराणा, औषधे खरेदीसाठी वापरता येतील. टाटा न्यू ऑनलाइन साइट किंवा टाटाच्या कोणत्याही ब्रँड स्टोअरमध्ये केलेल्या खरेदीसाठी हे कॉइन वापरता येतील. टाटा न्यू अॅप 60 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केले आहे.