रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक (Credit Card Link with UPI ) करण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. यानंतर ग्राहक क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करू लागले आहेत. यामुळे भविष्यात क्रेडिट कार्डधारक आणि यातील व्यवहार यात मोठी वाढ होईल, असा फिनटेक फर्म इन-सोल्यूशन्स ग्लोबल लिमिटेडचा (ISG) अंदाज आहे. फिनटेक फर्म इन सोल्यूशन्सच्या अंदाजानुसार क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांची संख्या 30 पट इतकी वाढू शकेल.
यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारण्यास 21 कोटी टर्मिनल्स उपलब्ध
सध्याच्या पद्धतीप्रमाणे PoS (पॉइंट ऑफ सेल) साठी 70 लाख टर्मिनल्सची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. यूपीआय क्रेडिट कार्डसोबत लिंक केल्यावर यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी पुरेशी सुविधा असणेही गरजेचे होते. आणि अशी सुविधा उपलब्ध असल्याहेही फिनटेकने स्पष्ट केले आहे. आता या प्रकारे पैसे स्वीकारण्यास 21 कोटी टर्मिनल्स उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड यूपीआयला लिंक करण्यापूर्वी डेबिट कार्डला लिंक करून ग्राहक व्यवहार करत होते. याद्वारे ते आपल्या बचत आणि चालू खात्यातील व्यवहारही करत होते. जूनमध्ये आरबीआयने क्रेडिट कार्डलाही लिंक करण्यास मान्यता दिली. याचा आता फायदा यूपीआय वापरकर्त्यांना होणार आहे.
‘या’ कारणासाठी यूपीआय- कार्ड लिंक करणे गरजेचे
रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी आणि त्यांच्या बँक खात्याचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक त्यांचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करतील. ज्याचा RuPay कार्ड स्वीकारण्याच्या आणि वापरावर सकारात्मक परिणाम होईल, असे फिनटेकने म्हटले आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरच्या संशोधनाप्रमाणे, 76% भारतीय जेव्हा ऑनलाइन शॉपिंग करतात तेव्हा चेकआऊट करताना यूपीआयला प्राधान्य देतात. यूपीआयशी लिंक केल्यावर क्रेडिट कार्डमध्ये इतकी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये 7.7 टक्के इतकी वाढ होऊन हे व्यवहार 730 कोटींवर आणि एकूण मूल्य 12.11 लाख कोटीहून अधिक इतके झाले आहे.