रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ (edible oil price reduced) लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या आणि धान्याच्या किमती वाढल्यानंतर सरकारने या वाढलेल्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलली होती. त्यामुळे देशातील विविध कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 रूपयांनी कमी केले आहेत. या दरांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत सरकारने तेलाच्या किमती (edible oil price rate) किमान 15 ते 20 रूपयांनी कमी करण्याचे आवाहन कंपन्यांना केले होते. त्यानुसार तेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात केल्या जाणाऱ्या तेलाच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे देशातील कंपन्यांनी ही लगेच तेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले होते. भारताला आपल्या एकूण गरजेपैकी 60 टक्के तेल हे बाहेरून आयात करावे लागते. मागील महिन्यात आयात तेलाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. पण आता या किमतींमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व कंपन्यांना तेलाच्या किमतीमध्ये कपात करण्यास सांगितले होते. सरकारच्या बैठकीनंतर देशात आणि महाराष्ट्रातही तेलाच्या किमती किमान 15 ते 20 रूपयांनी कमी (edible oil prices in Maharashtra) झाल्या आहेत.
मार्च 2022 नंतर तेलाच्या मागणीत घट!
खाली दिलेल्या तक्त्यांमधून तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की, फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर संस्थेच्या निर्देशांकांमध्ये तेलाची मागणी कशाप्रकारे वाढत गेली. एप्रिल 2020 ते मार्च 2022 या दरम्यान खाद्यतेलाची वाढ 81.2 ते 251.8 अंकापर्यंत तर वनस्पती तेलाची मागणी 92.5 ते 159.7 अंकापर्यंत वाढली होती. पण मार्च 2022 नंतर यामध्ये घट झाल्याचे दिसून येते.
भारतात दरवर्षी 23 दशलक्ष टन खाद्यतेलाची मागणी आहे. त्यापैकी 14.5 दशलक्ष टन तेल हे आयात केले जाते आणि अंदाजे 8 ते 9 दशलक्ष टन तेल हे देशांत उत्पादित केले जाते. आयात केलेल्या तेलांमध्ये प्रामुख्याने पाम तेलाचा सर्वाधिक (8 ते 9 मेट्रिक टन), सोयाबीन (3 ते 3.5 मेट्रिक टन) आणि सूर्यफुलाचा (2 ते 2.5 मेट्रिक टन) समावेश असतो. इतर देशांच्या तुलनेत मलेशिया आणि इंडोनेशियामधून तेल आयात करणं परवडतं. कारण या देशांमधून पाम तेलाचे टॅंकर भारतात येण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात. आणि इतर देशांमधून उदाहरणार्थ अर्जेटिना आणि ब्राझीलमधून तेल मागवल्यास त्याला भारतात 40 ते 45 दिवस लागतात. याचाही तेलाच्या किमतीवर परिणाम होतो.
तेलाच्या किमतींचा युक्रेन ते इंडोनेशिया प्रवास!
वाढती महागाई, धान्याच्या आणि तेलाच्या किमती वाढण्याची सुरूवात युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सुरू झाल्या. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा सूर्यफूल तेल उत्पादक देश आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. त्याचप्रमाणे मलेशिया आणि इंडोनिशियामध्ये कोविडच्या काळात स्थलांतरित मजुरांची कमतरता होती. त्याचा परिणाम पाम तेलाच्या उत्पादनावर झाला. अशाप्रकारे युक्रेन-रशिया आणि इंडोनेशिया या मार्गाने तेलाच्या किमतीत मजर दरमजल वाढ होत गेली. पण आता या परिस्थितीत बदल होताना दिसून येत आहे.
ब्राझील, अर्जेंटिना आणि पॅराग्वेमध्ये सोयाबीनचे उत्पादन पूर्ववत होण्याच्या स्थितीत आहे. इंडोनेशियामध्येही मे महिन्याच्या अखेरीस पाम तेलाच्या शिपमेंटवरील बंदी उठवण्यात आली. अशाप्रकारे जगातील सर्वात मोठ्या उत्पादकाकडून अतिरिक्त पुरवठा होण्याची चिन्हे दिसू लागल्याने भारतात तेलाच्या किमतीं खाली (edible oil price reduced in india) येऊ लागल्या आहेत.