ONGC Foundation Scholarship: ONGC फाउंडेशन हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ONGC फाउंडेशन शिष्यवृत्ती योजना राबवित असते. याअंतर्गत OBC श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी आणि गुणवंत SC/ST विद्यार्थ्यांसाठी ONGC शिष्यवृत्ती दिली जाते. ओएनजीसी शिष्यवृत्तीची पात्रता, उद्दीष्ट्ये, अर्ज प्रक्रिया, ओएनजीसी शिष्यवृत्तीची शेवटची तारीख यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Table of contents [Show]
ही शिष्यवृत्ती कोणाला दिली जाते?
ONGC शिष्यवृत्ती 2022-23 अंतर्गत, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या सामान्य 500 विद्यार्थ्यांना आणि OBC श्रेणीतील 500 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असते. तसेच SC आणि ST श्रेणीतील एकूण 1000 उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळत असते. एकूणच EWS,SC,ST आणि OBC विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होतो. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी दरमहा 4000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, म्हणजे 48000 रुपये प्रति वर्षाला दिले जाते.
ONGC शिष्यवृत्तीचे उद्दीष्ट्ये
ओएनजीसी फाऊंडेशनचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक समस्या दूर करणे आणि शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत देणे हे आहे. या शिष्यवृत्तीसाठी एकूण 2000 उमेदवारांची निवड केली जाते. 50% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव असते.
पात्रता आणि निकष काय आहे
- OBC, SC, ST आणि सामान्य श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी BE, MBBS, MBA किंवा भूगर्भशास्त्र/भूभौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवीचे पहिले वर्ष यांसारखे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी नियमित आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्याचे महाविद्यालय किंवा संस्था हे AICTE, MIC, UGC, AIU, राज्य शैक्षणिक मंडळ, राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने 12वी बोर्ड परीक्षेत किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
- उमेदवारांनी GPA/CGPA मध्ये 10 पैकी किमान 6.0 मिळवलेले असावेत.
- अर्जदाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- ओबीसी आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (ते इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावे)
- वयाचा पुरावा (एकतर जन्माचा दाखला किंवा दहावीचे गुणपत्रक)
- बारावीची गुणपत्रिका (बीई आणि एमबीबीएस करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी)
- ग्रॅज्युएशनची (पदवी) मार्कशीट (एमबीए आणि भूगर्भशास्त्र/जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)
- सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (प्रमाणपत्र इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावे)
- बँकेचे नाव, लाभार्थीचे नाव, बँक शाखा आणि IFSC कोड यासह बँक तपशील.
- पॅन कार्डची फोटो कॉपी
अर्ज करण्याची शेवटची तारीख
पात्र इच्छुक उमेदवारांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. ONGC शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 आहे .
कशी केली जाणार निवड
- उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि आर्थिक गरजेनुसार निवड केली जाते.
- उमेदवारांची अंतिम यादी ओएनजीसी तयार करते.BE आणि MBBS शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाते.
- जिओलॉजी/जिओफिजिक्समध्ये एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असलेले उमेदवार त्यांच्या पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जातात.
- बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) कुटुंबातील अर्जदारांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
- अल्प उत्पन्न कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
ONGC शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी www.ongcscholar.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            