Coca-cola Sales : वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्सच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. कोका-कोला इंडिया कंपनीने चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये 3 बिलीयनची विक्री केली आहे.
Table of contents [Show]
भारतात कोकाकोलाचा व्यापार
कोकाकोलाच्या जागतिक व्यापारामध्ये 3टक्के वाढ झाली आहे. ही वाढ भारतात झाली असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे. भारतातील किरकोळ विक्रेत्यांची साखळी उभारून त्यांच्या माध्यमातून योग्य सवलतीच्या दरात कोकाकोला उत्पादनाची विक्री केल्यामुळे आज कंपनीच्या जागतिक व्यापारामध्ये वृद्धी झाल्याचं मत कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकाकोला कंपनीने आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटिजीमध्येसुद्धा बदल करत आहे. आपल्या उत्पादनावर विविध सवलती, ऑफर्स देत बाजारातील विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच उन्हाळ्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपनीने भारतातमध्ये 30 हजार स्टोअर्स (गोडाऊन) आणि 40 हजार कुलर्सची संख्या वाढवली आहे.
उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स व आईसक्रिमच्या मागणीत वाढ
वाढत्या उकाड्यामुळे बाजारमध्ये एकुणच कोल्ड ड्रिंक्स, ज्यूसेस व आईस क्रिमच्या मागणीत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झालेल्या गर्मीमुळे शीतपेय उद्योग क्षेत्राच्या विक्रीमध्ये 30 ते 35 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यामध्ये मे महिन्यामध्ये अधिक वाढ होण्याची आशा विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
भारतातील आघाडीचे शीतपेय
कोका-कोला
कोका-कोला कंपनीचं कोला ड्रिंक हे भारतातील सर्वाधिक खपाचे शीतपेय आहे. भारतातील शीतपेय बाजारमध्ये कोकाकोल कंपनीचा हिस्सा 60 टक्के आहे. कोला प्रमाणेच या कंपनीचे अनेक ही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र 60 टक्क्यापैकी 40 टक्के उत्पादन विक्रीही कोला या उत्पादनाची होते.
पेप्सी
पेप्सी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकांच्या खपाचे पेय आहे. यापूर्वी या शीतपेयाला पेप्सी कोला नावाने ओळखलं जायचं. भारतात एकुण शीतपेय बाजारामध्ये पेप्सीचा हिस्सा हा 30.8 टक्के आहे.
स्प्राईट
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं ड्रिंक आहे ते म्हणजे स्प्राईट. स्प्राईट हे कोका-कोला कंपनीचंच एक उत्पादन आहे. 1999 पासून भारतात याची विक्री सुरू आहे. 2009 च्या सुमारास स्प्राईटची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढून पेप्सी या पेयाला मागे टाकत क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलेलं.
थम्प्स अप
भारतातील चौथ्या क्रमांकाचं शीतपेय आहे ते म्हणजे थम्प्स अप. थम्प्स अप हा भारतीय कंपनीचं उत्पादन असून 1977 पासून ते बाजारात उपलब्ध आहे. युवकांमध्ये या शीतपेयाची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे.