Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Christmas Gifts: 500 रुपयात मिळेल ख्रिसमससाठी 'हे' बेस्ट गिफ्ट; सर्वांच्याच राहील कायमस्वरूपी लक्षात

Christmas Gift Under 500 Rupees

Christmas Gift Under 500 Rupees: दरवर्षी ऑफिसमध्ये सिक्रेट सांताचा खेळ खेळाला जातो. 500 रुपयांत तुमच्या बजेटमध्ये फिट बसणारे काही गिफ्ट ऑप्शन्स चला बघुयात.

Christmas Gift Under 500 Rupees: डिसेंबर महिना आला की आपल्याला वेध लागतात ते ख्रिसमसचे. त्याच कारण पण तेवढंच विशेष आहे. आपल्या अवतीभवती पाहायला मिळणारी लायटिंग, ख्रिसमस ट्री, सांताची लाल रंगाची टोपी, सांताचा मास्क या सगळ्यामुळे आपोआपच ख्रिसमस वाईब्स (Christmas vibes) यायला सुरूवात होते. आपल्याला कोणीतरी गिफ्ट देतं तर कधीतरी आपण कोणाचेतरी 'सिक्रेट सांता(Secret Santa) होतो. दरवर्षी ऑफिसमध्ये हा सिक्रेट सांताचा खेळ तर ठरलेला असतो. पण प्रत्येकवेळी एकाच प्रश्न पडतो तो म्हणजे बजेटमध्ये कोणतं गिफ्ट द्यायचं. तुमच्या याच प्रश्नच उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. कसे? चला तर जाणून घेऊयात.

500 रुपयांत तुमच्या बजेटमध्ये फिट बसणारे काही गिफ्ट ऑप्शन्स बघूयात.

अर्बन फॉरेस्ट ऑलिव्हर ब्लॅक RFID ब्लॉकिंग लेदर वॉलेट (Urban Forest Oliver Black RFID Blocking Leather Wallet)

असं म्हणतात की 'ब्लॅक इज अल्वेज क्लासी' त्यामुळे काळ्या रंगातील अर्बन फॉरेस्ट ऑलिव्हर कंपनीचे लेदर वॉलेट तुम्हाला 500 रुपयांमध्ये Amazon वर सहज मिळून जाईल. हे वॉलेट एका सुंदर बॉक्ससोबत येत असल्याने तुम्हाला रॉयल लूक देईल.

पेपरक्राफ्ट एक्सप्रेशन्स क्लासिक पेन (Paperkraft Expressions Classic Pen)

कोणत्याही जेंटलमन व्यक्तीला तुम्ही पेन गिफ्ट दिलात तर केव्हाही आवडेल. पेन ही बौद्धिक संपत्तीचे प्रतीक मानतात. त्यामुळे तुम्ही पेपरक्राफ्ट एक्सप्रेशन्स क्लासिक पेन गिफ्ट करू शकता. या पेनला सुंदर पॅकेजिंग(Packaging) असल्याने तो अधिक उठून दिसून येतो. हा पेन तुम्हाला Amazon वर सहज उपलब्ध होईल.

टायफू अपलिफ्टिंग ग्रीन टी (Typhoo Uplifting Green Tea)

हल्ली सगळेच डायटवर प्रचंड लक्ष देतायत. ऑफिसमध्ये एकाच जागी बसून चरबी  वाढू नये याकरिता अनेक जण ग्रीन टी(Green Tea) पितात. मग जर एखाद्याला गिफ्ट द्यायचंच असेल तर ते त्याच्या आवडीचं का नको, Amazon वर तुम्हाला टायफू अपलिफ्टिंग ग्रीन टी बॅग 500 रुपयात सहज मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर देखील मिळून जातील. तेव्हा हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

मॅलोरेन ग्लास कॉफी आणि ज्यूस मग (MALOREN Glass Coffee & Juice Mug)

500 मिलीची क्षमता असणारा मॅलोरेन ग्लास कंपनीचा कॉफी आणि ज्यूस मग तुम्ही भेटवस्तू म्हणून नक्कीच देऊ शकता. हा मग दिसायला तर सुंदर आहेच पण हा तुम्हाला Amazon वर फक्त 500 रुपयांमध्ये मिळेल.

नेक्स्ट केअर लक्झरी लाँगलास्टिंग परफ्यूम (Next Care Luxury Long Lasting Perfume)

पुरुष किंवा स्त्रिया दोघांनाही वापरता येणारा नेक्स्ट केअर लक्झरी लाँगलास्टिंग परफ्यूम तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. Amazon वर 500 रुपयांच्या किंमतीमध्ये  तुम्हाला याचे 6 वेगवेगळे इसेन्स(6 different essences) सहज उपलब्ध होतील.