प्रत्येक पालकाचे आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य देण्याचे स्वप्न असते. पालकांना नेहमी त्यांच्या मुलांना पैशाची सवय लावून त्यांना आर्थिकदृष्ट्या सुज्ञ बनवायचे असते जेणेकरून ते आर्थिक स्थिर भविष्य साध्य करू शकतात. मुलांना पैशांचे महत्व कसे सांगावे याबाबत बरेच पालक अनेकदा गोंधळलेले असतात. बालदिन 2022 च्या निमित्ताने, आपल्या मुलांना पैशाच्या चांगल्या सवयी लावून आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालकांसाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.
Table of contents [Show]
- पॉकेटमनीचा योग्य वापर (Proper Use Of Pocket Money)
- आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे (Take Financially Correct Decision's)
- बजेट करायला शिकवा (Teach to Make Budget )
- कामांचा मोबदला देण्यास सुरुवात करा (Start Paying for the tasks)
- मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करू नका (Do not fulfill all the wishes of the children)
पॉकेटमनीचा योग्य वापर (Proper Use Of Pocket Money)
मुलं आपल्या पालकांकडून शिकत असतात. असे म्हटले जाते की, मुलांना पैशांच्या व्यवस्थापना बद्दल शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. लहान लहान गोष्टींद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना पैशांच्या व्यवस्थापनाची सवय लावू शकता. यामध्ये मुलांना काही वस्तू खरेदी करण्यास बाहेर पाठवणे, शालेय बाबींसाठी त्यांना देण्यात येणाऱ्या पॉकेटमनीचा योग्य वापर करणे या सारख्या गोष्टींचा समावेश होतो. या सवयी मुलांमध्ये पैशांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरतात.
आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे (Take Financially Correct Decision's)
तुमच्या मुलांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे? हे शिकवणे आजच्या दिवसात आणि युगात गरजेचे आहे. पैशांचे व्यवस्थापन करणे ही एक गोष्ट आहे जी प्रौढांनाही अनेकदा जमत नाही. त्यामुळे मुलांना पैशांच्या व्यवस्थापनाच्या सवयी लवकर लावल्यास त्यांना पुढील आयुष्यात आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
बजेट करायला शिकवा (Teach to Make Budget )
पैशांच्या नियोजनाबाबत माहिती देताना मुलांना पैशांचे बजेट कसे करावे हे हळुहळू शिकवावे. तुम्ही तुमच्या मुलांना कितीही पॉकेट मनी द्या तरी, तुमच्या मुलांना ते किती खर्च करतात आणि ते कुठे खर्च करायचे आहेत याचा मागोवा (record) ठेवण्यास सांगा. अशा सवयी लवकर लावणे नंतरच्या आयुष्यात मुलांना फायदेशीर ठरतात. एकदा त्यांनी कमाई सुरू केली की ते त्यांच्या उत्त्पन्नाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतात. एकदा त्यांना बचतीचे फायदे समजले आणि ते करायला सुरुवात केली की, त्यांना बजेट शिकवा. तुमच्या मुलांना त्यांच्या खर्चाचे तपशील ठेवण्यास सांगा आणि त्यांना मासिक बजेट सेट करण्यास सांगा. आवश्यक असल्यास, त्यांना त्यांच्या खर्चाचे वर्गीकरण करण्यास मदत करा. प्रत्येक कॅटेगरी मधील खर्चावर मर्यादा घाला आणि प्रत्येक कॅटेगरी मधील त्यांच्या खर्चाचे निरीक्षण करा.
तुमच्या मुलांना सहज पॉकेट मनी देणे टाळा. त्याऐवजी तुम्ही त्यांना कचरा काढणे, त्यांची खोली साफ करणे किंवा झाडांना पाणी देणे यासारख्या घरातील कामांचा मोबदला देण्यास सुरुवात करा. या उपक्रमामुळे त्यांना हे समजण्यास मदत होईल की पैसे कमावले जातात आणि केवळ हाती दिले जात नाहीत. मुलांना पैसे देण्यापूर्वी ते त्यांनी कमावले आहेत याची खात्री करून घ्या.
मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करू नका (Do not fulfill all the wishes of the children)
तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. जर त्यांनी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला तर त्यांना धीर धरण्यास सांगा आणि त्यांना याची गरज का आहे? यावर त्यांच्याशी चर्चा करा. विलंबाने पूर्ण केलेल्या गोष्टींमुळे तुमच्या मुलांमध्ये संयम विकसित करण्यास मदत करेल तसेच त्यांना योग्य निर्णय घेण्यास तयार करतात.