Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone Offers on Ecommerce Websites: जाणून घ्या दिवाळी निमित्त Amazon आणि Flipkart वरील आयफोन ऑफर्स!

iphone 14 price right to repair iphone14

Image Source : Apple.com

Amazon/ Flipkart: ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयफोन14, आयफोन13, आयफोन12 आणि आयफोन11 यासह स्मार्टफोनच्या खरेदीवर सूट आणि बँक ऑफर देत आहेत. आयफोन14 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅमसह येतो आणि त्याची किंमत ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी 79,900 रुपये आहे.

Amazon/ Flipkart: फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) सुरू आहे आणि ते 16 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे, ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलने (Amazon Great Indian Festival Sale) देखील तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. दोन्ही ई-कॉमर्स किरकोळ विक्रेते आयफोन14, आयफोन13, आयफोन12 आणि आयफोन 11 यासह स्मार्टफोनच्या खरेदीवर सूट आणि बँक ऑफर देत आहेत. काहीवेळा युजर्स एकाच विशिष्ट वेबसाइटवरून खरेदी करणे पसंत करतात आणि मग असे भन्नाट ऑफर गमावून बसतात. म्हणून, आम्ही तुमच्यासाठी आयफोनच्या किमतींची तुलना केली आहे जेणेकरून तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी योग्य तो निर्णय घेऊ शकता आणि ऑफरचा आनंद घेऊ शकता. (iPhone 14, iPhone 13, iPhone 12, iPhone 11, Smartphones)

आयफोन 14 च्या किंमत

आयफोन 14 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅमसह येतो आणि त्याची किंमत ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी 79,900 रुपये आहे. ऍमेझॉन डिव्हाइसवरून फ्री डिलीवर केल्या जात आहे तर फ्लिपकार्ट 29 रुपये (Secure packaging charges) SPC चार्ज आकारत आहे. फ्लिपकार्ट कडून Flipkart Axis Bank Card वापरकर्त्यांना 5% कॅशबॅक देण्यात येत आहे. या ऑफर्समधून किंमत 75,905 रुपयांपर्यंत खाली आणत आहे. इतर बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी कोणत्याही सवलतीच्या ऑफर नाहीत.

दुसरीकडे, ऍमेझॉन EMI प्लॅनवर 1250 रुपयांपर्यंत 10% सूट आणि नॉन-ईएमआयवर 1000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, या ऑफर मुळे किंमत 78,740 रुपयांपर्यंत खाली येत आहे. ही सूट ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि सिटी बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डधारकांना लागू आहे. तुमच्याकडे फ्लिपकार्ट-अॅक्सिस बँक कार्ड (Flipkart-Axis Bank Card) असल्यास, फ्लिपकार्टवरुन खरेदी करू शकता. आणि तुमच्याकडे ऍमेझॉन ऑफरवर चालणारे कार्डे असल्यास iPhone 14 खरेदी करण्यासाठी ऍमेझॉनवर जावू शकता. (ICICI Bank, Axis Bank and Citibank)

आयफोन 13 ची किंमत

आयफोन 13 (128GB) ची किंमत बिग दिवाळी सेल अंतर्गत फ्लिपकार्टवर आणि ऍमेझॉनवर 64,900 रु. आहे. त्याचे (Secure packaging charges )SPCचार्ज 29रु आहे. फ्लिपकार्ट कोटक बँक आणि SBI क्रेडिट कार्डवर 1250 रुपयांपर्यंत 10% सूट देत आहे, त्यामुळे याची किंमत 58,769 रुपयांपर्यंत खाली येत आहे. ऍमेझॉन वर 1250 रुपयांपर्यंतची 10 टक्के सूट ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि सिटी बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड धारकांना लागू आहे, त्यामुळे याची किंमत 63,650 रुपये झाली आहे. आता या दोन मधील नक्की काय निवडायचं हे तुमच्या हाती आहे. 

आयफोन 12 ची किंमत

फ्लिपकार्टवर आयफोन 13 आणि आयफोन 12 च्या किमतीत फारसा फरक नाही ही आनंदाची बाब आहे. ऍमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत डिव्हाइसची किंमत 53,490 रुपये आहे. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म संबंधित बँकांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून 10 टक्के सूट  देत असल्याने, सवलतीनंतर 52,240 रुपयांमध्ये ऍमेझॉन वरून आयफोन12 खरेदी करणे कधीही परवडणारे आहे. (Amazon and Flipkart)

आयफोन 11ची किंमत

फ्लिपकार्टवर डिव्हाइसच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 43,019 रुपये आणि  29रु (Secure packaging charges)SPC चार्ज आहे. SBI/Kotak कार्ड वापरून 10 टक्के सूट दिल्यानंतर, डिव्हाइसची किंमत 41,769 रुपये मिळते. (Buy an iPhone)