Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Raman Kant Munjal Scholarship: फायनान्स विषयक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलाय? मग या स्कॉलरशिपसाठी अर्ज कराच…

Raman Kant Munjal Scholarships

तुम्ही जर फायनान्स विषयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल आणि शैक्षणिक खर्चामुळे चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. एक तर फायनान्स विषयीच्या कोर्सेसची फी ही इतर अभ्यासक्रमांपेक्षा अधिक असते. तुम्ही देखील फायनान्स विषयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल आणि शैक्षणिक मदतीसाठी कुठल्या शिष्यवृत्तीची माहिती घेत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

तुम्ही जर फायनान्स विषयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल आणि शैक्षणिक खर्चामुळे चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. एक तर फायनान्स विषयीच्या कोर्सेसची फी ही इतर अभ्यासक्रमांपेक्षा अधिक असते. मात्र आजच्या युगात फायनान्सबद्दल ज्ञान हे असायलाच हवं हे सगळ्यांनाच वाटतं. तेव्हा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यी केवळ आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रमण कांत मुंजल फाउंडेशनद्वारे रमण कांत मुंजल शिष्यवृत्ती दिली जाते.

तुम्ही देखील फायनान्स विषयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल आणि शैक्षणिक मदतीसाठी कुठल्या शिष्यवृत्तीची माहिती घेत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा. या शिष्यवृत्तीसाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे हे लक्षात असू द्या. 

कुणाला दिली जाते शिष्यवृत्ती?

फायनान्सशी संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणे तसेच विद्यार्थ्यांचे करियरचे स्वप्न पूर्ण करणे हे या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत सध्या बीबीए (BBA), बीएफआयए (BFIA), बीकॉमच्या (B.Com) 1ल्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी. तसेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS), इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (IPM), बीए (Economics), बॅचलर इन बिझनेस स्टडीज (BBS), बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स (BBI), बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स ( BAF) आणि B.Sc. (Statistics) किंवा इतर कोणत्याही फायनान्स संबंधित पदवी अभ्यासक्रमांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीसाठी प्रति वर्ष 5,00,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय?

  • ही शिष्यवृत्ती केवळ भारतीय विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे. 
  • अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 10 आणि 12 च्या परीक्षेत किमान 80% गुण प्राप्त केलेले असावेत.
  • अर्जदार विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा जास्त नसावे. 
  • मान्यतापात्र शिक्षणसंस्थेत फायनान्ससंबंधी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.

शिष्यवृत्तीची रक्कम किती?

रमण कांत मुंजल फाउंडेशनद्वारे दिलेल्या माहितीनुसार 40,000 रुपये ते 5,00,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. 3 वर्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. तिन्ही शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने उत्तम शैक्षणिक कामगिरी करणे अपेक्षित आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील आवश्यक आहे.

प्रत्येक विद्यालयाची आणि विद्यापीठाची कोर्स फी वेगवेगळी असते, त्यामुळे शिष्यवृत्तीची अचूक रक्कम प्रवेश मिळवलेल्या महाविद्यालयीन शुल्कावर अवलंबून असेल.

कुठली कागदपत्रे आवश्यक?

  • इयत्ता 10 आणि 12 चे मार्कशीट
  • अर्जदाराचे आधार कार्ड 
  • पालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड 
  • उत्पन्नाचा पुरावा जसे की उत्पन्न प्रमाणपत्र, पगारदार पालकांची पगार स्लिप
  • अर्जदाराच्या पालकांचे बँक खाते विवरण
  • चालू वर्षाचा महाविद्यालय प्रवेश पुरावा
  • कॉलेजने जारी केलेली कॉलेज फीची पावती
  • प्रतिज्ञापत्र (अर्जदारांनी दिलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या माहितीनुसार खरी असल्याचा पुरावा) 
  • पासपोर्ट छायाचित्र

शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा कराल?

  • या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी https://rkmfoundation.org/scholarships/ या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. 
  • वेबसाईटवर शिष्यवृत्तीसाठी  'Apply Now' बटणावर क्लिक करा.
  • आता एक फॉर्मची लिंक ओपन होईल. 
  • यात तुमच्या ईमेल, मोबाइल नंबर व इतर आवश्यक माहिती भरा. 
  • संबंधित कागदपत्रे सेल्फ असेस्टेड असावीत, ती अपलोड करा.
  • 'अटी आणि नियम' वाचा आणि फॉर्म सबमिट करा.

इथे संपर्क करा

तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि जर तुमची या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली असल्यास तुम्हाला रमण कांत मुंजल फाउंडेशनद्वारे संपर्क केला जाईल. याबाबत आणखी काही शंका असल्यास, कृपया येथे संपर्क साधा: 011-430-92248 (Ext-326) (सोमवार ते शुक्रवार - सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6 वाजता) इमेल: Scholarships@rkmfoundation.org