• 06 Jun, 2023 19:15

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IT Act 44ADA: छोट्या व्यावसायिकांना 50% कर सवलत देणारा हा आयकर कायदा तुम्हाला माहितीच असायला हवा!

IT Act 44ADA

Presumptive Tax Scheme for Professionals: स्वतःचा छोट्या स्वरूपातील व्यवसाय चालवणारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, तसेच चित्रपट किंवा नाटक कलाकार आणि तत्सम व्यावसायिक IT Act 44ADA नुसार 50% कर सवलत मिळवण्याचा दावा करू शकतात. चला तर जाणून घेऊयात कलम 44ADA ची ठळक वैशिष्‍ट्ये आणि ते छोट्या उद्योगांसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात.

आयकर कायदा, 1961 च्या कलम 44ADA नुसार छोट्या स्वरूपातील व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी एक विशेष कर योजना दिली जाते. या कर योजनेनुसार ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 75 लाख रुपये आहे त्यांना 50% कर सवलतीचा दावा करता येतो. मागील वर्षी ही उत्पन्न मर्यादा 50 लाख रुपये इतकी होती, यावर्षीच्या अर्थसंकल्पात ही उत्पन्न मर्यादा. 75 लाख रुपये इतकी केली गेली आहे. ही करयोजना विशेषतः लहान करदात्यांसाठी फायदेशीर आहे. मोठमोठ्या कंपन्यांची आर्थिक उलाढालीचा लेखाजोखा ठेवण्यासाठी, कर संकलन आणि कर भरणा यांची माहिती ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची आवश्यकता असते. छोट्या स्वरूपातील व्यावसायिकांना अनेकदा याबाबत अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सरकारने करसवलत देण्याची योजना आणली आहे.

कोणते व्यावसायिक करू शकतात दावा 

स्वतःचा छोट्या स्वरूपातील व्यवसाय चालवणारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, तसेच चित्रपट किंवा नाटक कलाकार आणि तत्सम व्यावसायिक IT Act 44ADA नुसार 50% कर सवलत मिळवण्याचा दावा करू शकतात. चला तर जाणून घेऊयात कलम 44ADA ची ठळक वैशिष्‍ट्ये आणि ते छोट्या उद्योगांसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात.

पात्रता निकष

कलम 44ADA अंतर्गत लाभांसाठी पात्र होण्यासाठी, खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. +करदाता भारतीय निवासी व्यक्ती असणे आवश्यक आहे.तसेच हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा भागीदारीत त्यांची फर्म असणे देखील आवश्यक आहे. सोबतच व्यवसायातून करदात्याने वर्षभरात केलेली आर्थिक उलाढाल 75 लाखांपेक्षा अधिक नसावी, ही प्रमुख अट आहे. याशिवाय करदात्याने आयकर कायद्याच्या कलम 30 ते 38 अंतर्गत कोणत्याही कपातीचा दावा केलेला नसावा.

कर संकलन कसे होते?

कलम 44ADA अंतर्गत, आर्थिक वर्षात करदात्याचे करपात्र उत्पन्न त्यांच्या एकूण आर्थिक उलाढालीवर  अवलंबून असते. करपात्र उत्पन्न त्यांच्या वर्षभरात झालेल्या एकूण आर्थिक व्यवहाराच्या 50% म्हणून गणले जाते.

याचा अर्थ असा की करदात्याला खात्यांची तपशीलवार हिशोब ठेवण्याची किंवा ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, कारण करपात्र उत्पन्नाची गणना संबंधित आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांना गृहित धरूनच केली जाते.

असे असले तरी एकूण आर्थिक व्यवहारांत केवळ 5% व्यवहार रोखीने व्हायला हवेत, बाकी व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीनेच व्हायला हवेत असा या कर योजनेचा निकष आहे. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता प्राप्तीकर विभागाला समजणे सोपे जाईल.  

कलम 44ADA चे फायदे

कलम 44ADA लहान व्यावसायिकांसाठी सोपी आणि सुलभ करपद्धती निवडण्याचा विकल्प दिला जातो. या कर योजनेत त्यांना खात्यांची तपशीलवार नोंद ठेवण्याची किंवा ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे त्यांचा प्रशासकीय खर्च कमी होतो आणि त्यांचा वेळ आणि श्रम देखील वाचतात.

करपात्र उत्पन्नाची गणना आर्थिक व्यवहारांच्या टक्केवारीनुसार केली जात असल्याने, छोट्या करदात्यांना नियमित कर प्रणालीच्या तुलनेत कमी कर द्यावा लागतो. यामुळे व्यावसायिकांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न देखील वाढते.

कलम 44ADA अंतर्गत कर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. करदात्याला फॉर्म ITR-4 मध्ये एक कर रिटर्न भरणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फक्त त्यांचे उत्पन्न आणि खर्चाचे मूलभूत तपशील देणे आवश्यक आहेत.