Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tenancy Rights: कोणत्या परिस्थिती भाडेकरू घरावर सांगू शकतो हक्क, जाणून घ्या

Tenancy Rights

Tenancy Rights: जर भाडेकरूच तुमच्या घरावर हक्क सांगू लागला तर काय कराल? खरे तर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि जिथे भाडेकरूलाच घराचा ताबा मिळाला आहे. होय, अशी देखील काही प्रकरणे आहेत. तेव्हा वेळीच जर सावधगिरी बाळगली तर स्वतःच्या घराचा ताबा भाडेकरूला देण्याची वेळ येणार नाही.

भाड्याने घर देणे किंवा घेणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. गुंतवणूक म्हणून घेतलेले घर देखील भाड्याने दिले जाते. उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले जाते. अनेकांची गुंतवणूक म्हणून खरेदी केलेली घरे ही त्यांच्या मूळ गावापासून लांब असतात. महिन्याला भाडे मिळते म्हणून घराला, भाडेककरुला भेट देण्यासाठी देखील लोक वर्षोनुवर्षे जात नाहीत.परंतु हाच निष्काळजीपणा महागात पडू शकतो ले लक्षात असू द्या. आपली मालमत्ता मग ती कुठल्याही स्वरूपातील असू द्या त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

परंतु जर भाडेकरूच तुमच्या घरावर हक्क सांगू लागला तर काय कराल? खरे तर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि जिथे भाडेकरूलाच  घराचा ताबा मिळाला आहे. होय, अशी देखील काही प्रकरणे आहेत. तेव्हा वेळीच जर सावधगिरी बाळगली तर स्वतःच्या घराचा ताबा भाडेकरूला देण्याची वेळ येणार नाही.

मालमत्ता कायदा काय सांगतो?

भारतात, भाडेकरू आणि संपत्तीचे अधिकार विविध राज्य-विशिष्ट कायद्यांद्वारे नियंत्रित केले जातात. हे कायदे भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील नातेसंबंध आणि दोन्ही पक्षांचे हक्क आणि दायित्वे यासाठी कायदेशीर हक्क-अधिकार याबद्दल माहिती देते. .

भारतीय मालमत्तेच्या अधिकारांतर्गत ( Indian Property Rights), भाडेकरू एखाद्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. यासाठी भाडेकरूने घरावर किंवा जागेवर 12 किंवा त्याहून अधिक वर्षे ताबा आहे हे सिध्द केले पाहिजे. या कालावधीत भाडेकरू नियमितपणे भाडे भरत असल्यास आणि कोणताही खंड पडू न देता जर मालमत्तेचा ताबा स्वतःकडेच आहे हे सिध्द करत असल्यास संपत्तीची मालकी त्याला मिळू शकते. हा नियम सरकारी मालमत्तेला मात्र लागू पडत नाही. सरकारी मालमत्तेवर सरकारला वाटेल तेव्हा ते हक्क सांगू शकतात आणि संबंधित जागेबाबत निर्णय घेऊ शकतात.

भाडेकरूने घरावर हक्क सांगताना  प्रॉपर्टी डीड (Property Deed), कर पावती, वीज किंवा पाण्याचे बिल, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र इत्यादी गोष्टी सादर केल्या तर त्याला ताबा मिळू शकतो. त्यामुळे आपल्या अपरोक्ष भाडेकरू या सगळ्या गोष्टींची जमवाजमव करत तर नाहीये ना याची खातरजमा करून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे वीज बिल, पाण्याचे बिल हे घरमालकानेच भरले पाहिजे, म्हणजे नंतर अडचणीत वाढ होणार नाही.

भाडेकरुला घरातून काढता येणार नाही

कायद्यानुसार जर भाडेकरूने घरावर हक्क सांगितला असेल आणि वाद न्यायप्रविष्ट असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घरमालक भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही.

तसेच भाडेकरार संपण्याआधी जर भाडेकरूला काढायचे असेल तर घरमालकाने भाडेकरूला बेदखल करण्याचे वैध कारण दिले पाहिजे. तसेच भाडेकरूला नोटीस जारी केली पाहिजे आणि मालमत्ता रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला पाहिजे. नोटीसचा कालावधी संपल्यानंतरही भाडेकरू मालमत्ता रिकामी करत नसल्यास, घरमालक भाडेकरूला बाहेर काढण्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू करू शकतो.

भाडेकरूने त्याच्या भाडेकराराच्या कालावधीत जर घरात स्वखर्चाने काही बदल, काही बांधकाम केले असेल तर भाडेकरू घरमालकाकडे त्याचा खर्च मागू शकतो. त्यामुळे भाडेकरार करतानाचा हा मुद्दा करारात नमूद करायला हवा आणि घरमालकाच्या परवानगीशिवाय घरात कुठलेही बदल करण्याची मुभा देण्यात येऊ नये. त्यामुळे संभाव्य कायदेशीर अडचणी टळू शकतात.

प्रतिकूल ताब्याचा कायदा ब्रिटिश काळापासूनचा आहे. सोप्या शब्दात समजावून सांगायचे झाले तर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा कायदा आहे. तथापि, वर दिलेल्या परिस्थितीत ते स्वीकारले जाते. 12 वर्षांचा कायदा सरकारी मालमत्तेला लागू होत नाही. हे फार जुन्या कायद्यानुसार केले जाते. यामुळे अनेक वेळा मालकांना त्यांची मालमत्ता गमवावी लागते. बर्याच काळासाठी भाड्याने राहणारे लोक ते वापरण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी घरमालकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

काय घ्याल काळजी?

भाडेकरार करताना विशेष काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. भाडेकरार हा 11 महिन्यांचा जर केला तर मध्ये 1 महिन्याचा खंड पडतो. त्यामुळे सलग 12 वर्षे कुणाकडे मालमत्ता राहत नाही. तसेच वेळोवेळी भाडेकरू बदलण्याचा पर्याय देखील घर मालकाकडे असतो. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापासून घरमालक वाचू शकतो.