HDFC बँक ही देशातील एक महत्वाची अशी एक बँक आहे. नागरिकांना वित्तीय सेवा पुरविणे हे या बँकेचे मुख्य काम असले तरी सामाजिक कामात देखील बँकेची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. याच सामाजिक कार्याचा भाग म्हणून बँकेने ‘HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2023-24’ सुरु केला आहे.
या परिवर्तन ECSS प्रोग्राममध्ये गुणी, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी बँक प्रयत्न करते. चला तर जाणून घेऊया ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते.
एचडीएफसी बँकेच्या या उपक्रमाचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे हा आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
याशिवाय जे विद्यार्थी तंत्रशिक्षण घेत आहेत, म्हणजेच ज्यांनी इंजिनिअरींग डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे, तसेच जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत अशांना देखील या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.
ही योजना Educational Crisis Support Scholarship (ECSS) अशी आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडीअडचणींचा सामना करावा लागतो आहे, अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ECSS कार्यक्रमांतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक/कौटुंबिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याची ज्यांच्यावर वेळ आली आहे अशा विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी 75,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
पात्रता काय असावी?
- जे विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असतील, ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदारांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण प्राप्त केलेले असावेत.
- विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
- ही योजना फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठीच आहे.
कागदपत्रे कुठली आवश्यक?
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्र
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स)
- चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
- अर्जदार बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश
- उत्पन्नाचा पुरावा
- ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला
- प्रतिज्ञापत्र
अर्ज कसा कराल?
- ही शिष्यवृत्ती योजना HDFC बँकेने Buddy4Study च्या सहयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे Buddy4Study वर तुम्हांला आधी तुमचे खाते बनवावे लागेल. Buddy4Study येथे तुमच्या ईमेल/मोबाइल/Gmail खात्यासह नोंदणी करा.
- तुमच्या नोंदणीकृत आयडीसह Buddy4Study वर लॉग इन करा आणि ‘फॉर्म पेज' वर जा.
- तुम्हाला आता 'HDFC Bank Parivartan's ECSS Programme' अर्ज फॉर्म पेज दिसेल.
- अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी 'Start Application' बटणावर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक ते सर्व तपशील अचूक भरा.
- फॉर्ममध्ये विचारलेले संबंधित कागदपत्रे व्यवस्थितअपलोड करा
- 'अटी आणि नियम' स्वीकारा आणि 'पूर्वावलोकन' वर क्लिक करा.
अर्जामध्ये भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर अचूक दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'सबमिट' बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हांला तुमच्या नोंदणीकृत इमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल.
तुमचे सर्व कागदपत्रे तपासली जातील आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास तुम्हांला संपर्क देखील केला जाईल. तसेच तुमची या शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली आहे किंवा नाही हे देखील तुम्हांला मेलद्वारेच कळविण्यात येईल.