Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flexi Cap Mutual Funds: तुमच्या पोर्टफोलिओत या योजना आहेत का? सर्वाधिक परतावा देणारे 12 फ्लेक्सी कॅप फंड जाणून घ्या

Flexi Cap Mutual Funds

मागील एक वर्षापासून भांडवली बाजार डळमळला आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकावर झाला असून इक्विटी मार्केटमधील जोखीम अधिक वाढली आहे. अनेक गुंतवणूक प्लॅन्समधील परतावा तर मायनसमध्ये गेला आहे. दरम्यान, काही फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्सनी 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्या योजना कोणत्या ते पाहा.

Flexi Cap Mutual Funds: मागील एक वर्षापासून जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांमधून मिळणारा परतावा कमी झाला आहे. अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे गुंतवणुकदार निश्चित परतावा देणाऱ्या योजनांच्या मागे जात आहेत. अनेक फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजनांनी मागील वर्षभरापासून मुदत ठेवींच्या(FD) दरापेक्षाही कमी परतावा दिला आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Association of Mutual Funds in India- AMFI) या संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दोन फ्लेक्सी कॅप फंडांनी मागील एक वर्षाच्या काळात निगेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत. तर दोन फ्लेक्सी कॅप फंडांनी 5% दराने परतावा दिला आहे. यावरुन लक्षात येते की बाजाराची अवस्था काय झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक गुंतवणूकदार जोखीम नसलेल्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. त्यामध्ये सुवर्ण गुंतवणूक, स्थावर मालमत्ता, एफडी, सरकारी आणि पोस्टाच्या बचत योजनांना पसंती दिली जात आहे.  

इतर 14 डायरेक्ट फ्लेक्सी कॅप फंड्सने मागील वर्षभरात 10 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच एक अंकी परतावा दिला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार निराश झाले. असे असतानाही 12 डायरेक्ट म्युच्युअल फंड्सने 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या योजना आहेत का पडताळून पाहा. खाली मागील वर्षभरात सर्वाधिक परतावा देणाऱ्या 12 फ्लेक्सी कॅप फंड्सची माहिती दिली आहे.

सर्वाधिक परतावा देणाऱ्या फ्लेक्सी कॅप फंड योजना

जे एम फ्लेक्सी कॅप फंड (JM Flexicap Fund)

जे एम फ्लेक्सी कॅप या डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅनने मागील एक वर्षात 17.15% टक्के परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 16.17% टक्के परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड S&P BSE 500 मधील कंपन्यांवर आधारित आहे.

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड (HDFC Flexi Cap Fund)

एचडीएफसी डायरेक्ट फ्लेक्सी कॅप फंडने एक वर्षात 16.93% परतावा दिला तर रेग्युलर मोडद्वारे या प्लॅनने 16.17% रिटर्नस दिले. हा फ्लेक्सी कॅप फंड NIFTY 500 मधील कंपन्यांवर आधारित आहे.

आयसीआयसीआय प्रुडेंशियल फ्लेक्सीकॅप फंड 

या प्लॅनने डायरेक्ट गुंतवणुकीतून 15.39% परतावा दिला. तर रेग्युलर पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीवर 13.95% टक्के परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड S&P BSE 500 मधील इंडेक्सवर आधारित आहे.

क्वांट फ्लेक्सी कॅप फंड (Quant Flexi Cap Fund)

क्वांट डायरेक्ट प्लॅनने एक वर्षात 13.14% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 11.27% परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड S&P BSE 500 मधील इंडेक्सवर आधारित आहे.

इनव्हेस्को इंडिया फ्लेक्सी कॅप फंड (Invesco India Flexi Cap Fund)

इनव्हेस्को इंडिया फ्लेक्सी कॅप प्लॅनने एक वर्षात 12.07% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 10.16% परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड S&P BSE 500 मधील इंडेक्सवर आधारित आहे.

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड (Parag Parikh Flexi Cap Fund) 

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडने मागील एक वर्षात डायरेक्ट पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीवर 11.76% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनवर 10.70% परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड NIFTY 500 इंडेक्सवर आधारित आहे.

एडलवाइस फ्लेक्सी कॅप फंड (Edelweiss Flexi Cap Fund)

एडलवाइस फ्लेक्सी कॅप डायरेक्ट फंड स्कीमने मागील एक वर्षात 11.29% परतावा दिला. तर रेग्युलर गुंतवणुकीवर 9.43% परतावा मिळाला. हा फ्लेक्सी कॅप फंड NIFTY 500 इंडेक्सवर आधारित आहे.

कोटक फ्लेक्सी कॅप फंड (Kotak Flexicap Fund)

कोटक फ्लेक्सी कॅप डायरेक्ट म्युच्युअल फंडने मागील एक वर्षात 11.51% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 10.49% टक्के वार्षिक परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड NIFTY 500 इंडेक्सवर आधारित आहे.

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड (Franklin India Flexi Cap Fund)

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप डायरेक्ट फंडने मागील एक वर्षात 10.26% परतावा दिला. तर रेग्यूलर योजनेने 9.46% परतावा दिला. हा फ्लेक्सी कॅप फंड NIFTY 500 इंडेक्सवर आधारित आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ फ्लेक्सी कॅप फंड (Mahindra Manulife Flexi Cap Fund)

या फंडच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील वर्षभरात 10.88% परतावा मिळाला. तर रेग्युलर प्लॅनमधून 8.72% परतावा मिळाला. ही फंड NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.

डीएसपी फ्लेक्सी कॅप फंड (DSP Flexi Cap Fund)

DSP Flexi Cap डायरेक्ट फंडने मागील वर्षभरात 10.21% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 9.02% परतावा दिला. ही फंड NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.

बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड (Bank of India Flexi Cap Fund)

या फंडच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील वर्षभरात 10.15% परतावा मिळाला. तर रेग्युलर योजनेत  8.32% परतावा मिळाला. ही फंड S&P BSE 500 इंडेक्सला ट्रॅक करतो. 

डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)