Cheapest Loan from SBI : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 4 ऑक्टोबर 2022 पासून 31 जानेवारी 2023 पर्यंत आपल्या गृहकर्जावरील व्याज दरात 15 ते 30 बेसिस पॉईंटने कपात केली. सध्या भारतात सणांचा माहौल सुरू आहे. नुकताच दसरा झाला. दोन आठवड्यांनी दिवाळी येणार आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआय बॅंक स्वस्त होम लोन ऑफर (Low Interest Rate Home Loan) घेऊन आली आहे. तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरच्या आधारावर एसबीआयचे होम लोन 8.40 ते 9.05 टक्क्यांच्या रेंजमध्ये मिळू शकेल. सध्या एसबीआयचे होम लोनचा व्याजदर 8.55 ते 9.05 टक्के यादरम्यान आहे. याशिवाय फेस्टिव्हल सिझनमध्ये तुम्ही जर होम लोन (Home Loan) घेत असाल आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला प्रोसेसिंग फी सुद्धा भरावी लागणार नाही.
सिबिल स्कोर चांगला असेल तर...
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज लोन मिळू शकेल. State Bank of India तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमीतकमी व्याजदराने लोन देते. उदाहरणार्थ तुमचा सिबिल स्कोअर 800 च्या वर असेल तर तुम्हाला 8.55 टक्के व्याजदराने होम लोन मिळू शकेल. 750-799 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.65 टक्के दराने, 700-749 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. 650-699 सिबिल स्कोअर असलेल्यांना 8.85 टक्के आणि 550-649 स्कोअर असलेल्यांना 9.05 टक्के दराने कर्ज मिळू शकेल.
काय असतो सिबिल स्कोअर?
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला बॅंकेकडून लगेच कर्ज मिळू शकते. त्याचबरोबर बॅंक कमीतकमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. पण जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात खूप अडचणी येऊ शकतात. साधारणत: 750 आणि त्यावरील स्कोअरला चांगला सिबिल स्कोअर मानला जातो. क्रेडिट स्कोअरच्या हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा पाहिलं जातं की, पूर्वीच कर्ज तुम्ही दिलेल्या मुदतीत फेडलं आहे.
सिबिल स्कोअर ऑनलाईन कसा पाहायचा?
तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाईन www.cibil.com या वेबसाईटवर चेक करू शकता. साईटवर गेल्यावर तुम्ही Get your CIBIL SCORE वर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमचा सिबिल स्कोअर पाहू शकता.