बांधकामाच्या खर्च दिवसेदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट वीट वाळू, स्टीलच्या किंतमीमध्ये सातत्याने चढ होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता सिमेंटच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर पासून देशातील सिमेंट कंपन्याकडून (cement industry) सिमेंटच्या दरामध्ये वाढ करणार असल्याचे वृत्त झी बिझनेसने दिले आहे.
30 रुपयांपर्यंत होईल वाढ
सिमेंट निर्मात्या कंपन्यांकडून या महिन्यातच सिमेंटच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार 1 ऑक्टोबर पासून सिमेंटच्या किमतीमध्ये 10 रुपये ते 30 रुपये प्रति बॅग वाढ होऊ शकते. त्यामुळे बांधकामसाठी येणाऱ्या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. सध्या मान्सूनचा परिताचा प्रवास सुरू झाला आहे.त्यामुळे बांधकामाच्या कामांनी सुरुवात होणार असल्याने सिमेंटच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंट कंपन्यांकडून दरामध्ये वाढ केली जाणार आहे.
सिमेंटच्या किमती 300 च्या पुढेच
सध्या मार्केटमध्ये 43 ग्रेडच्या सिमेंटसाठी ACC Cement 316 रुपये बॅग आहे. तसेच बिर्ला सिमेंट 420, जे के लक्ष्मी 310, दालमिया 365 रुपये, कोरोमंडोलो 360 रुपये प्रति बॅग असे काही प्रमुख सिमेंट कंपन्यांचे दर आहेत. यामध्ये आणखी 10 ते 30 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या किमतीही जास्त आहेत.
देशातील सिमेंट उद्योगाच्या मे 2023 च्या अहवालानुसार देशात 2022 मध्ये 3,644.5 मिलियन टन सिमेंटचे प्रोडक्शन झाले होते. आगामी काळात म्हणजे 2028 पर्यंत सिमेंट उद्योगाची उत्पादन क्षमता ही 4,832.6 मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी अशा सिमेंट उद्योगाला आहे.