Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards

Image Source : http://www.india.postsen.com/

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Government will Give Cashback: मोबाईल युजर्सला ‘भीम युपीआय’ (BHIM UPI) आणि 'रूपे’ (RuPay UPI) या डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक  देण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या योजनेला शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

काय आहे योजना (What is the Plan)

भारतात डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी शासन 2600 कोटी रूपये खर्च करणार आहे. या योजनेव्दारे ग्राहकांनी BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे व्यवहार केला, तर त्या ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे. मात्र हा व्यवहार कमी किंमतील असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, ही जी कॅशबॅक रक्कम आहे, ती बॅंकेकडून दिली जाणार आहे.

किती कॅशबॅक मिळणार (How much Cashback will you Get)

रुपे (Rupay) कार्डद्वारे डिजिटल स्वरूपात पैशांचा व्यवहार केला तर 0.4 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच भीम युपीआय (Bhim UPI) द्वारे 2000 रुपयांपेक्षा कमी पैशांचा व्यवहार केलेल्या रकमेवर 0.25 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याव्यतिरिक्त BHIM UPI द्वारे म्युच्युअल फंड,  इन्श्युरन्स, ज्वेलरी आणि पेट्रोलियम प्रॉडक्टसारखी उत्पादने आणि सेवा खरेदी केल्यास 0.15 टक्के कॅशबॅक दिले जाणार आहे.

युपीआयचे पूर्वीचे ट्रान्जक्शन (Previous UPI transactions)

डिसेंबरमध्ये युपीआयद्वारे 12 लाख कोटींपेक्षा अधिक व्यवहार करण्यात आला होता. जानेवारी महिन्यात युपीआयव्दारे 730 कोटींहून जास्त व्यवहार झाले. हे व्यवहार देशाच्या जीडीपीच्या 54 टक्क्यांच्या आसपास आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण ट्रान्जक्शनची व्हॅल्यू 11.9 लाख कोटी रुपये होती. मागील वर्षी युपीआयद्वारे 7404 कोटी ट्रान्जक्शन झाले होते. ज्यामध्ये 125 लाख कोटी ही रक्कम डिजिटल पेमेंटच्या स्वरूपात देण्यात आली. आता डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाणे वाढावे यासाठी 2600 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम युजर्सला कॅशबॅकच्या स्वरूपात देणार आहे. मात्र कमी किंमतीतील व्यवहारांवर हा कॅशबॅक देण्यात येणार आहे.