• 07 Dec, 2022 08:35

Card Tokenization : तुम्ही जर टोकेनायझेशन आज केलं नाही तर काय बंद होईल? डेबिट की क्रेडिट कार्ड!

Credit & Debit Card Tokenization

RBI Tokenization : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) Debit आणि Credit कार्डचे टोकेनायझेशन करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली. ही तारीख जर तुमच्याकडून हुकली तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.

RBI Tokenization : डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे टोकेनायझेशनची (Credit and Debit Card Tokenization) प्रक्रिया पूर्ण करण्याची आज (दि. 30 सप्टेंबर) शेवटची तारीख आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने टोकेनायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख यापूर्वी दोनदा बदलली. आता मात्र आरबीआयने 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्याचे जाहीर केले. उद्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून ज्या कार्डधारकांनी टोकेनायझेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांच्या ऑनलाईन पेमेंटमध्ये अडचणी (Disturbance in Online Payemt) येऊ शकतात.

टोकेनायझेशनच्या प्रक्रियेबाबत क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांमध्ये संभ्रम आहे. त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, 30 सप्टेंबरपूर्वी टोकेनायझेशनची प्रक्रिया पूर्ण नाही केली तर काय होईल? क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड बंद होणार का? (Credit or Debit Card Will Stop?) किंवा कार्डमधून ऑनलाईन पेमेंट होणार नाही? टोकेनायझेशनची प्रक्रिया पूर्ण नाही केली तर ग्राहकांचं नेमकं काय नुकसान होणार? ऑनलाईन पेमेंट करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल? अशा प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

[media url="https://www.youtube.com/watch?v=wDIJqVz7lQ0"][/media]


क्रेडिट की डेबिट कार्ड बंद होणार!

टोकेनायझेशनची प्रक्रिया (Tokenization Process) पूर्ण करण्याचा आज (दि. 30 सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. आरबीआयने टोकेनायझेशनची प्रक्रिया लोकांची होणारी फसवणूक कमी करण्यासाठी सुरू केली. तुम्ही जर 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचं टोकेनायझेशनची प्रक्रिया पूर्ण केली नाही. तरी तुमचे कार्ड बंद होणार नाही. तुम्ही त्याचा पूर्वीसारखाच वापर करू शकता. फक्त कार्ड वापरताना तुम्हाला सर्वप्रथम टोकेनायझेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी विचारेल. तुम्ही जर ती नाही केली तर तुम्हाला तुमच्या कार्डचे सर्व डिटेल्स पुन्हा पुन्हा टाकावे लागतील. ते वेबसाईटवर सेव्ह होणार नाही.

टोकेनायझेशन नाही केलं तर नुकसान काय होणार?

आरबीआयने ही प्रक्रिया ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे टोकेनायझेशन करायचे की नाही हा सर्वस्वी कार्डधारकाचा निर्णय असेल. यामुळे तुमचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतील, असं आरबीआयचं म्हणणं आहे. तुम्ही जर ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुम्हाला प्रत्येकवेळी कार्डची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. यामुळे तुमचा वेळ वाढेल. सतत कार्ड सोबत ठेवावे लागेल. तसेच यापूर्वी तुम्ही जर एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटवर तुमच्या कार्डची माहिती सेव्ह केली असेल तर ती उद्यापासून डी-अॅक्टीवेट होईल आणि तुम्हाला पुन्हा सर्व माहिती द्यावी लागेल.

टोकेनायझेशनचा फायदा काय?

आरबीआयच्या माहितीनुसार, टोकेनायझेशनच्या प्रक्रियेमुळे कार्डधारकाच्या व्यवहारांमध्ये अधिक सुस्पष्टता येईल. कार्डधारकाने केलेल्या व्यवहारांची माहिती आणि कार्डबाबतची माहिती सुरक्षित राहील. टोकेनायझेशन केल्यानंतर सतत कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एका युनिक टोकनचा वापर करून जलदगतीने पेमेंट करू शकता.