Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: निवृत्तीनंतरचे नियोजन म्हणून दुसऱ्या घराचा पर्याय योग्य आहे का?

Second Home, Retirement Plan, Investment , Real Estate

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: दुसरे घर खरेदी करणे म्हणजे सामान्यपणे सदनिका (फ्लॅट) हा त्यातलाच एक पर्याय म्हणून अनेकजण याचा विचार करत असतात. हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्दे विचारत घायला हवेत.

आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन करताना निवृत्तीनंतरच्या कालावधीचा विचार करणे खूप महत्वाचे असते. विशेषत: चाळीशीनंतर याचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक ठरते. ते करत असताना गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय उभे राहत असतात. 'दुसरे घर खरेदी करणे घेणे' म्हणजे सामान्यपणे सदनिका (फ्लॅट) हा त्यातलाच एक पर्याय  म्हणून अनेकजण याचा विचार करत असतात. हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्दे विचारत घायला हवेत.

भाड्याचे उत्पन्न मिळते.

निवृत्तीनंतर दरमहा एक निश्चित उत्पन्न हातात मिळणे आवश्यक असते. ते दुसरे घर घेण्यामुळे भाड्याच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. याचं गोष्टीमुळे बहुतांश जण या पर्यायचा विचार करताना दिसतात.

घराची किंमत, भाडे वाढते राहते

घराची किंमत ही सामान्यत: वाढत जाते. तसेच भाडे हेदेखील सर्वसाधारण परिस्थितीत दरवर्षी वाढताना दिसते. वर्षाकाठी होणारी भाडेवाढ आणि घराची किंमत वाढल्याने घर मालकाचे उत्पन्न देखील वाढते. नियमित उत्पन्नासाठी   हा एक आकर्षक पर्याय म्हणून समोर उभा राहतो.

मिळणारे उत्पन्न गुंतवणुकीच्या तुलनेत अत्यल्प 

यातून दरमहा मिळणारे भाडे मिळून नियमित उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होऊ शकतो. पण, हे भाडे त्यात कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत विचार केला तर कमीच दिसते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

भाडेकरू न मिळाल्यास मेंटेनन्सचा खर्च

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत म्हणून विचार करताना या मुद्द्याचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य भाडेकरू मिळणे, ही अगदी सहज गोष्ट नसते. या प्रक्रियेत भाडं न मिळता छोट्या किंवा मोठ्या कालावधीसाठी तुमचे घर रिकामे राहू शकते. घर कोणत्या भागात आहे, हे सुद्धा अशा वेळी महत्वाचे ठरते. अशा काळात भाड्याचे उत्पन्न तर नाहीच उलट देखभालीचा खर्चचं आपल्याला उचलावा लागू शकतो.

तुमचे वय किती आहे?

तुम्ही कर्ज काढून घर घेताना हा मुद्दा महत्वाचा ठरतो. कर्ज फेडण्यासाठी तुमच्या नोकरीची किमान 10 ते 15 वर्षे शिल्लक असणे महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला व्यवस्थित कर्ज फेडता येईल. मात्र याकाळात तुम्हाला निवृत्तीवेतनासाठीचे नियोजन करणे कठिण जाऊ शकते.

इतर गुंतवणूक किती आहे?

दुसऱ्या घराव्यतिरिक्त तुमची आणखी गुंतवणूक किती आहे, याचादेखील विचार करणे आवश्यक आहे. कारण घराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता असू शकते. यामुळे अन्य गुंतवणूक पुरेशी नसेल तर केवळ यावर अवलंबून राहणे हे अडचणीचे ठरु शकते.