Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Offer : स्वस्तात खरेदीची संधी; HP च्या 'या' लॅपटॉपवर मिळतेय 11 हजार रुपयांपर्यंतची सूट

www.croma.com/www.digitaldreamsjaipur.com

क्रोमा या ई कॉमर्स वेबसाईटवर एचपी कंपनीच्या HP 15s-fq2717TU या मॉडेलच्या किमतीवर मोठी सवलत दिली जात आहे. वेबसाईटवर या लॅपटॉपची किंमत 49,025 इतकी असून तुम्हाला हा सवलतीमध्ये 37,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

मोबाईल प्रमाणेच लॅपटॉपची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलीय. मार्केटमध्ये विविध इलेक्ट्रॉनीक्स कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. मात्र, बजेटमध्ये लॅपटॉप घ्यायचा असेल तर आपल्याला एखाद्या सेलची अथवा कंपनीच्या ऑफर्सची वाट पाहावी लागते.तुम्ही देखील लॅपटॉप खरेदीचा प्लॅन केला असेल तर तुम्हाला HP कंपनीचा लॅपटॉप स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय रिटेलर कंपनी क्रोमाने एचपीच्या लॅपटॉपवर 11000 रुपयांपर्यतची बंपर ऑफर दिली आहे.

HPच्या या लॅपटॉपच्या किमतीवर 22% सवलत

क्रोमा या ई कॉमर्स वेबसाईटवर एचपी कंपनीच्या  HP 15s-fq2717TU या मॉडेलच्या किमतीवर मोठी सवलत दिली जात आहे. वेबसाईटवर या लॅपटॉपची किंमत 49,025 इतकी असून तुम्हाला हा सवलतीमध्ये 37,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला या लॅपटॉपच्या किमतीवर जवळपास 22 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच लॅपटॉपच्या खरेदीवर निवडक क्रेडिट कार्डांवर 2000 रुपयांपर्यंत सुपर सेव्हिंग ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तुम्हाल हा लॅपटॉप हप्त्यांवर खऱेदी करता येणार असून तुम्हाला यासाठी 1788 रुपयांच्या इएमआय द्यावा लागेल.

लॅपटॉपचे फिचर्स-

HP 15s-fq2717TU (Intel Core i3 11th Gen) या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. सिल्व्हर रंगातील या आकर्षक लॅपटॉपला 8GB DDR4 RAM आणि 512GB SSD ROM इतकी स्टोरेज कॅपेसिटी आहे. यामध्ये MS Office Home & Student 2021, HP Documentation सॉफ्टवेअर देण्यात आले आहेत.लॅपटॉपला 3 USB पोर्ट, HDMI पोर्ट, मल्टी कार्ड स्लॉट, हेडफोन आणि माइक कॉम्बो जॅक पोर्ट देण्यात आले आहे.