व्यवसायात नोकरीच्या तुलनेने दरमहा कमाई जास्त होण्याची शक्यता असते. म्हणूनच लोक नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य देतात. अनेकांना अतिशय कमी भांडवलातून एक उत्तम परतावा देणार व्यवसाय उभारायचा असतो. म्हणूनच आपण अशा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत की, अतिशय कमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 50 हजारांची कमाई करु शकता.
व्यवसाय कसा सुरू करायचा
कार वॉशिंग सेंटरमध्ये कार धुण्यासाठी व्यावसायिक मशीनची आवश्यकता असते. बाजारात 14 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या अनेक मशिन्स उपलब्ध आहेत. तुम्ही कमी गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. काही कालावधीनंतर तुम्ही मोठ्या मशीन्स खरेदी करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला सुमारे 14,000 किमतीचे 2 हॉर्स पावर इतकी पंपिंग क्षमता असलेले मशीन विकत घ्यावे लागेल. तसेच व्यावसायिक व्हॅक्युम क्लिनर खरेदी करावे लागेल. ज्याची किंमत सुमारे 30 ते 35 हजार रुपये इतकी असेल. शॅम्पू, हातमोजे, टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिशच्या पाच लिटर कॅनसह गाडी धुण्याच्या सामानाची किंमत 1,700 रुपयांपर्यंत जाऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही अंदाजे 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून या व्यवसायाला सुरुवात करू शकता
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागेची आवश्यकता?
तुम्हाला वरदळ असलेल्या भागात हा व्यवसाय सुरू करता येणार नाही. गाडी धुण्यासाठी आणि पार्कींगसाठी मोकळी जागा लागते. पर्यायी तुम्हाला कार मेकॅनिकशी बोलून गॅरेजमध्ये हा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल. तसेच येणाऱ्या ग्राहकांसाठी एक वेटिंग रूम तयार करावे लागेल. जेणेकरून तातडीने येणाऱ्या ग्राहकांना थांबवून लगेच गाडी स्वच्छ करून देऊ शकता. यासाठी बऱ्यापैकी जागेचे नियोजन करावे लागेल. सरासरी हा व्यवसायासाठी अंदाजे 1500 स्क्वेअर फूट जागा लागू शकते.
50 हजारांची मासिक कमाई शक्य
कार स्वच्छ करण्याची शुल्क शहरानुसार वेगवेगळे असते. लहान शहरांमध्ये साधारणतः 150 ते 450 रुपये लागतात. त्याचवेळी मोठ्या शहरांमध्ये यासाठी 250 रुपये द्यावे लागू शकतात. तसेच गाड्यांच्या प्रकारानुसार जसे की, स्विफ्ट डिझायर, ह्युंदाई वर्ना यासारख्या कारसाठी 350 रुपये आणि एसयूव्हीसाठी 450 रुपये शुल्क आकारले जाते. जर एका दिवसात 7 ते 8 कारचे काम मिळाले तर सरासरी 250 रुपये प्रति कारने दररोज 2000 रुपयांची कमाई होऊ शकते. अशाप्रकारे एका महिन्यात 40 ते 50 हजार रुपये सहज कमवता येऊ शकतात.
Source: www.hindi.moneycontrol.com