Maruti Suzuki Cars: ऑटो क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणली जाणारी Maruti Suzuki मे 2023 मध्ये आपल्या निवडक मॉडेलवर ग्राहकांसाठी डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. डीलरकडे असलेल्या कार्सचा स्टॉक कमी करण्यासाठी आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत.
Table of contents [Show]
अल्टो 800 मॉडेलवर मिळत आहे ऑफर
कंपनीने Alto 800 मॉडेलच्या एक्सचेंजवर 15000 रुपये सूट दिली आहे. कंपनीकडून Alto 800 च्या नवीन मॉडेल K10 वर 40,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. Alto 800 K10 च्या एक्सचेंजवर 15000 रुपये ऑफर आणि 4000 रुपये स्पेशल ऑफर देण्यात आली आहे.
S-Presso मॉडेलवर सूट!
त्याच वेळी, कंपनीने एस प्रेसो कार मॉडेलवर ग्राहकांना 35000 रुपये
ऑफर दिली आहे. एक्सचेंज ऑफर 15000 आणि विशेष विक्री ऑफर 4000 रुपये दिलेली आहे. प्रेसो मॉडेलच्या AMT आणि CNG मॉडेल्ससाठी देखील ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. AMT मध्ये एक्सचेंज ऑफर म्हणून 15000 रुपये सूट देण्यात आली आहे. तर स्पेशल ऑफर म्हणून 4000 रुपये सूट देण्यात आली आहे. CNG व्हेरियंटसाठी 25000 रुपये ऑफर देण्यात आली आहे. तसेच 15000 रुपयांची ऑफर एक्सचेंजवर दिली जात आहे.
'वॅगनआर'वर 30000 रुपयांची सूट
मारुती सुझुकी कंपनीच्या WagonR मॉडेल बद्दल बोलायचे झाल्यास, WagonR मॉडेल साठी 30,000 रुपये ऑफर आहे. SPM ऑफर 4000 आणि एक्सचेंज ऑफर 20,000 आणि SPL ऑफर 5000 रुपये आहे. त्याच WagonR च्या AMT मॉडेल बद्दल बोलायचे झाल्यास, येथे एक्सचेंज ऑफर अनुक्रमे 20,000 रुपये आणि SPL ऑफर 4000 रुपये आहेत.
स्विफ्टवर काय आहे ऑफर
तसेच मारुती कंपनीच्या स्विफ्ट आणि डिझायर या दोन मॉडेल्सवर नजर टाकली तर, स्विफ्टवर 30,000 रुपये ऑफर आहे. आणि 4000 SPL ऑफर आहे. आणि एक्सचेंज ऑफर 20,000 रुपये आहे. डिझायर वर 10,000 रुपये एक्सचेंज ऑफर आहे.
सेलेरिओ टू मॉडेल्सवरही सूट
Celerio CNG साठी 20,000 आणि एक्सचेंजसाठी 15000 रुपयांची ऑफर दिली आहे. Celerio करीता 15,000 आणि एक्सचेंज करीता 35,000 रुपयांची ऑफर दिलेली आहे.