सध्या टेलिकॉम कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज प्लॅन अतिशय महागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक परवडतील असे स्वस्तातील मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहेत. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन BSNL कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी फक्त 100 रुपयांमध्ये 6 वेगवेगळे प्रीपेड प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि एसएमएसची (SMS) सेवा मिळणार आहे. सर्वात कमी किमतीत म्हणजे अगदी 18 रुपयापासून ते या स्कीममधील सर्वांत महाग म्हणजे 99 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तुम्हीही BSNL कंपनीचे ग्राहक असाल तर कंपनीच्या या 6 प्रीपेड प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Table of contents [Show]
18 रुपयांचा बेसिक प्रीपेड प्लॅन
BSNL कंपनीचा सर्वात स्वस्त बेसिक प्लॅन 18 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात आहे. हा प्लॅन ग्राहकांना 2 दिवसाच्या वैधतेसह उपलब्ध करून दिला जाणार आहे. या दोन दिवसात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1 GB डेटा पुरवण्यात येणार आहे. ग्राहकांना देण्यात आलेला 1 GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80 Kbps होईल.
75 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
30 दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना BSNL कंपनी 75 रुपयांचा स्वस्तातील प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये ग्राहकांना पर्सनलाईज रिंगटोनची (Personalized Ringtone) सुविधा दिली जात आहे. सोबत 200 मिनिटांचा लोकल आणि एसटीडी टॉकटाईम मिळणार आहे. तसेच 2GB इंटरनेट डेटाही देण्यात येणार आहे.
87 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
87 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसची (SMS) सुविधा दिली जात आहे. तसेच हार्डी मोबाईल गेम सुविधेसह ग्राहकांना दररोज 1 GB इंटरनेट डेटा पुरविला जाणार आहे.
94 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
94 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 मिनिटांचा लोकल आणि एसटीडी टॉक टाईम दिला जात आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह मिळणार आहे. तसेच वापरकर्त्याला 3 GB डेटा पुरवण्यात येणार आहे.
97 रुपयांचा सुपरहिट प्रीपेड प्लॅन
BSNL कंपनीचा सर्वात पॉप्युलर 97 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 18 दिवसाची वैधता देण्यात येत आहे. 2 GB डेटा सोबत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय ग्राहक दररोज 100 एसएमएस (SMS) पाठवू शकणार आहेत.
99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 22 दिवसांची वैधता दिली जात आहे. यामध्ये ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉल आणि पर्सनलाईज रिंगटोनची सुविधा देण्यात येत आहे. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना एसएमएस किंवा इंटरनेटची सुविधा मिळणार नाही.
Source: hindi.moneycontrol.com