सध्या सर्वच कंपन्यांचे मोबाईल रिचार्जचे प्लॅन महाग झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना परवडतील असे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) उपलब्ध करून देण्याबाबत विविध नेटवर्क कंपन्या विचार करत होत्या. बऱ्याच नामांकित टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्लॅन घेऊन येत आहेत. त्यात बीएसएनएलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन (Validity Extension Plan) लॉन्च केला आहे.
BSNL च्या व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅनच्या माध्यमातून ग्राहक रिचार्जद्वारे प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवू शकतात, हे या प्लॅनचे खास वैशिष्ट्य आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वैधतेसह अनेक सुविधा मिळणार आहेत. ज्यासाठी त्यांना खूपच कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीकडून 5 वेगवेगळे प्लॅन (Plan) जाहीर करण्यात आले आहेत. त्यातून ग्राहकांना नेमके काय-काय मिळणार आहे. हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
BSNL चे 5 वेगवेगळे व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
105 रुपयांचा व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
सध्या बीएसएनएलचे पाच व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन उपलब्ध आहेत. 105, 107, 153, 197 आणि 199 रुपयांचे हे प्लॅन वापरकर्त्यांमध्ये तुफान धुमाकूळ घालत आहेत. 105 रुपयांचा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह वापरकर्त्यांना देण्यात येत आहे. सोबतच अनलिमिटेड कॉल आणि 2 GB डेटाही दिला जात आहे.
107 रुपयांचा व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
107 रुपयांचा प्लॅन हा वापरकर्त्यांना 40 दिवसाच्या वैधतेसह देण्यात येत आहे. याशिवाय 200 मिनिटांचे व्हॉइस कॉलिंग, 40 दिवसांसाठी बीएसएनएल कॉलिंग ट्यून पुरवण्यात येत आहे. सोबत 3 GB डेटाही देण्यात येत आहे. 105 रुपयांच्या प्लॅनमधील सुविधांच्या तुलनेत केवळ 2 रुपये अतिरिक्त भरून 107 रुपयांच्या प्लॅनमधील वाढीव सुविधांचा लाभ वापरकर्ते घेऊ शकतात.
153 रुपयांचा व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि दररोज 1 GB डेटा पुरवण्यात येणार आहे. सोबतच बीएसएनएल कॉलिंग ट्यूनही 26 दिवसांसाठी दिली जाईल. याशिवाय प्रत्येक दिवसाला वापरकर्त्यांना 100 एसएमएस करता येणार आहेत.
197 रुपयांचा व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
197 रुपयांच्या व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉल्स 84 दिवसांच्या वैधतेसह प्राप्त होणार आहेत. याशिवाय दररोज 2 GB डेटा आणि 100 एसएमएस प्रति दिवसा करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच 18 दिवसांसाठी वापरकर्त्यांना जिंग अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे.
199 रुपयांचा व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 30 दिवसाच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉल्सची सुविधा दिली जाणार आहे. तसेच दररोज 2 GB डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे.
Source: moneycontrol.com