• 05 Feb, 2023 13:40

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Update: 2 हजार 500 टक्के रिटर्न देणारा स्टॉक आता, 73 टक्क्यांनी स्वस्त!

Brightcom Group shares

Image Source : www.businessnewsthisweek.com

Brightcom Group: 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा देणार्‍या स्टॉकची गेल्या एका वर्षापासून अत्यंत खराब कामगिरी आहे. या स्टॉकने 2021 मध्ये 2,500% इतका मोठा परतावा दिला आहे.

Brightcom Group shares: 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा देणार्‍या स्टॉकची गेल्या एका वर्षापासून, म्हणजे 2022 मध्ये अत्यंत खराब कामगिरी झाली. ब्राईटकॉम ग्रुप कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये 2 हजार 500 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे. 2022 मध्ये भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ठरली होती. ब्राईटकॉम ग्रुप लिमिटेडच्या (Brightcom Group Ltd) शेअर्समध्ये मागील आठवड्यात मात्र 7 टक्क्यांची वाढ झाली. दिग्गज गुंतवणूकदार मानले जाणारे, शंकर शर्मा यांची यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यांच्या गुंतवणुकीमुळे आणि शेअर्सची किंमत खाल्यावल्यामुळे सध्या अनेक गुंतवणुकदार यात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरसावत आहेत.

एका वर्षात शेअर 73 टक्क्यांनी घसरला (The stock fell 73% in a year)

ब्लूमबर्गच्या डेटानुसार, ब्राईट कॉमच्या स्टॉकमध्ये 2022 मध्ये जवळपास 73 टक्के घसरण झाली आहे, ज्यामुळे तो एस अँड पी 500  (S&P: Standard and Poor's 500), बीएसई (BSE: Bombay Stock Exchange) निर्देशांकावर सर्वात वाईट कामगिरी करणारा ठरला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 104 रुपयांवरून 28.20 रुपयांपर्यंत घसरला. शेअर्समधील ही विक्री सुरू झाली जेव्हा बाजार नियामकाने कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे असू शकतात अशी चिंता व्यक्त केली.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अर्थात सेबीने गेल्या वर्षी ब्राईटकॉमच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी डेलॉयट टूचे तोहमात्सु इंडिया एलएलपीची (Deloitte Touche Tohmatsu India LLP) नियुक्ती केली. सेबीने वेगाने हालचाल करणे आणि त्यांची तपास यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे, लुथरा आणि लुथरा लॉ ऑफिसेस इंडियाचे भागीदार हरीश कुमार म्हणाले.

ब्राईटकॉम समूहातील शंकर शर्मा यांचा हिस्सा जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीसाठी ब्राइटकॉम समूहाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अनुभवी गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम समूहाचे 2.50 कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 1.24 टक्के आहे.

ब्राईटकॉम ग्रुप विषयी (About Brightcom Group)

ब्राईटकॉम ग्रुप ही 2000 साली स्थापन झालेली डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. ब्राइटकॉम ग्रुप ही कंपनी अॅड-टेक, न्यू मीडिया आणि आयओटी (IoT: Internet of things) मध्ये कार्यरत आहे. कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. या कंपनीची इतर कार्यालये यूएस, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, उरुग्वे, मेक्सिको, युके, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, युक्रेन, सर्बिया, इस्रायल, चीन येथे आहे. तर, ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि इटलीमध्ये प्रतिनिधी तसेच भागीदार आहेत.