Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sula Vineyards: सुला विन्यर्डचा तिमाहीचा निकाल आल्यावर, शेअर्स झपाट्याने वाढू लागलेत!

Sula Vineyards Shares Surge

Image Source : www.tradebrains.in.com

Sula Vineyards shares jumped high: नुकतेच सुला विनयार्ड्सचे तिमाहिचे निकाल सादर झाले आहेत. यात कंपनीचा नफा वाढला असल्याचे दिसले आहे, ज्यामुळे शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे बातमीत वाचा.

Sula Vineyards Shares Surge from IPO Price Date Listing: 2023 वर्षातल्या, पहिल्याच महिन्यातील तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या, म्हणजे 16 जानेवारी रोजीचच्या ट्रेडिंग दिवशी सुला विनयार्ड्सचे शेअर्स 19.37 टक्क्यांपर्यंत वाढले. शेअर शुक्रवारी 325.45 रुपयांवर बंद झाला होता आणि सोमवारच्या व्यवहाराच्या दिवशी तो 388.50 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. सुला विनयार्डचा आयपीओ बाजारात आल्यापासून, गुंतवणुकदारांचे केवळ नुकसानच झाले आहे, मात्र आता या स्टॉकने चढता क्रमाने जाण्यास सुरुवात केली आहे.

खरे तर देशातील आघाडीची वाइन कंपनी सुला विनयार्ड्सने डिसेंबर तिमाहीतील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या कालावधीत सुला विनयार्ड्सच्या ब्रँड विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, नवीन शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अनुभवी गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी डिसेंबर तिमाहीत कंपनीतील 1.9 टक्के हिस्सा विकत घेतला. सुला विनयार्ड्सचा आयपीओ (IPO: Initial Public Offer) गेल्या महिन्यातच डिसेंबरमध्ये आला होता. तेव्हापासून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्रैमासिक निकालात काय लिहिले आहे? (What's in the quarterly results?)

डिसेंबर तिमाहीत, सुला विनयार्ड्सने एका वर्षापूर्वी डिसेंबर तिमाहीत ब्रँडद्वारे 165.7 कोटी रुपयांची विक्री केली होती. त्याच वेळी, कंपनीने डिसेंबर तिमाहीत 187.2 कोटी रुपयांच्या ब्रँडची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2022-2023 (FY23) च्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ब्रँड विक्री 28 टक्के वाढली. याव्यतिरिक्त, कंपनीच्या वाइन पर्यटन महसूलात 13 टक्के वाढ झाली आणि ही वाढ 23 कोटी रुपये एवढी झाली.

मुकुल अग्रवालांकडे 1.9% शेअर्स (Mukul Aggarwal holds 1.9% shares)

मुकुल अग्रवाल यांच्याकडे सध्या कंपनीत सुमारे 16 लाखांचे शेअर्स आहेत, जे सुमारे 1.9 टक्के इक्विटीच्या समतुल्य आहे. बीएसईवर (BSE: Bombay Stock Exchange) शेअरचा शेवटचा व्यवहार 365.20 रुपये प्रति शेअर होता. तो 13.13 टक्क्यांनी वाढून 325.45 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 368.20 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला.

12 डिसेंबर रोजी आयपीओ उघडला (The IPO opened on December 12)

सुला विनयार्ड्सने 12 ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत त्यांचा आयपीओ (IPO) लॉन्च केला. या आयपीओची इश्यू किंमत 340-357 रुपये होती. कंपनी 22 डिसेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. तथापि, समभागांची सूची सवलतीत झाली. शुक्रवारी, सुला विनयार्ड्सच्या शेअरची किंमत बीएसईवर 325.45 रुपये होती.