• 09 Feb, 2023 07:28

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bollywood Celebs Bodyguard Salary : सलमान, शाहरुख आणि अमिताभ बच्चन त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार देतात?

Bollywood Celebs Bodyguard Salary

Image Source : www.filmfare.com

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेत तैनात असलेले त्यांचे पर्सनल बॉडीगार्डही अनेकदा खळबळ उडवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जे बॉडीगार्ड बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी त्यांच्या संरक्षणात उभे असतात त्यांना किती पगार मिळतो? (Bollywood Celebs Bodyguard Salary) हे आज आपण पाहूया.

बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrities) त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूड कलाकार त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी लाखोंचा खर्च करत असतात. मग एखादी संपत्ती असो वा त्यांचे बॉडीगार्ड. चाहत्यांच्या घोळक्यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जीविताची संपूर्ण जबाबदारी हे बॉडीगार्ड्स 24 तास पार पाडत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेत तैनात असलेले त्यांचे पर्सनल बॉडीगार्डही अनेकदा खळबळ उडवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जे बॉडीगार्ड बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी त्यांच्या संरक्षणात उभे असतात त्यांना किती पगार मिळतो? (Bollywood Celebs Bodyguard Salary) यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार देतात? हे माहीत आहे का? आज आपण बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार देतात ते पाहूया.

सलमान खानच्या बॉडीगार्डचा पगार

अभिनेता सलमान खान सोबत त्याचा बॉडीगार्ड शेरा नेहमी दिसतो. तो बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय बॉडीगार्ड मानला जातो. शेरा हा सलमान खानच्या सुरक्षेत नेहमी उभा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  बॉडीगार्ड शेराला त्याच्या सेवेसाठी अभिनेता सलमान खान त्याला दरवर्षी 2 कोटी रुपये मानधन देतो.

शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीचा पगार

पगाराच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंगचे नाव आघाडीवर घेण्यात येते. बातम्यांमध्ये येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाल्यास किंग खानच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या रवीला त्याच्या सेवेबदल्यात वर्षाला 2.7 कोटी रुपये मिळतात.

बॉडीगार्ड युवराज घोरपडेचा पगार

अभिनेता आमिर खानच्या बॉडीगार्डचे नाव युवराज घोरपडे असे आहे. त्याला त्याच्या सुरक्षेसाठी अभिनेत्याकडून दरवर्षी 2 कोटी रुपयांचे मानधन मिळते.

बॉडीगार्ड जितेंद्र शिंदेचा पगार

बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन त्यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यास त्याच्या सेवेसाठी मोठी रक्कम देतात. अमिताभ यांच्याकडून जितेंद्र शिंदेंना वार्षिक दीड कोटी रुपये पगार देण्यात येत असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

अक्षय कुमार देतो एवढे मानधन

अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबियांसोबत त्याचा बॉडीगार्ड श्रेयस ठेले अनेक प्रसंगी दिसतो.  रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अक्षय कुमार त्याचा बॉडीगार्ड श्रेयसला वार्षिक 1.2 कोटी रुपये पगार देतो.