Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Flyovers: मुंबईतील 55 फ्लायओव्हरचे आयुर्मान पालिका तपासणार

Mumbai Flyover

Image Source : https://mahamoney.com/bombay-stock-exchange-financial-literacy-lessons-for-municipal-students

Mumbai Flyovers: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीच्या आधारावर भविष्यातील उपाययोजना आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BMC will check the lifespan of 55 flyovers in Mumbai: नुकतीच काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून मुंबई महानगरपालिकेला रस्ते हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. त्यांनतर पालिका महापालिकेच्या ब्रीज विभागाने(BMC Bridge Dept) मुंबईतील 55 फ्लायओव्हरचा तपशील एमएमआरडीएकडे(MMRDA) मागितला आहे. एमएमआरडीने(MMRDA) नेमलेल्या कंपनीकडे या फ्लायओव्हरच्या देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी 2026 पर्यंत असणार आहे. मात्र त्याआधीच या फ्लायओव्हरची देखभाल दुरूस्तीचे काम मिळावे म्हणून पालिकेने एमएमआरडीए(MMRDA) सोबत संपर्क साधला आहे.    

वाहनांची संख्या वाढल्याने प्लायओव्हरवर अतिरिक्त भार (Number of vehicles has increased)

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या(MMRDA) मदतीने पालिकेने ठिक ठिकाणी प्लायओव्हर(Flyover) बांधले आहेत. त्यावेळच्या वाहनांच्या अंदाजाच्या क्षमतेने या फ्लायओव्हरची निर्मिती करण्यात आली होती. परंतु गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. मुळात डिझाईन(Design) केलेल्या फ्लायओव्हरच्या लोडच्या तुलनेत अधिक वजनाची वाहतूक फ्लायओव्हरवर सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्यासंदर्भातील फ्लायओव्हरची माहिती पालिकेने एमएमआरडीएकडून(MMRDA) मागितली आहे.

या डेटाची कशी होईल मदत? (How can this data be helpful?)

हा  फ्लायओव्हरच्या(Flyover) बांधणीसाठी वापरण्यात आलेले  मटेरिअल(Material), भार वाहण्याची क्षमता, लोड टेस्टबाबतची माहिती(Load Test Info), देखभाल आणि दुरूस्तीची कामे अशी सर्व माहिती पालिकेने एमएमएमआरडीएला(MMRDA) मागितली आहे. त्यामुळे ही सर्व माहिती एमएमआरडीएला(MMRDA) पालिकेपुढे सादर करावी लागणार आहे. जेणेकरून पालिकेला(BMC) यापुढच्या काळात या फ्लायओव्हरची देखभाल आणि दुरूस्ती करताना या माहितीची मदत होणार आहे. काळानुसार या फ्लायओव्हरचे नेमके आयुष्यमान तपासणे तसेच भविष्यातील उपाययोजना आखणे यातून शक्य होणार आहे असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता फ्लायओव्हरच्या आयुष्यमानावर झालेला परिणाम तसेच कमी झालेले आयुष्यमान अभ्यासणे हेच आमचे उदिष्ट असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.