The Indian crypto market has seen minor growth: गेल्या काही काळापासून क्रिप्टो बाजारात सातत्याने घसरण होतहोती. मात्र जागतिक क्रिप्टो बाजारात तुलनेने कमी घसरण होतहोती. बाजाराने आपला 800 अब्ज डॉलरचा आकडा खाली जाऊ दिला नव्हता. मात्र या महिन्यात पहिल्यांदाच जागतिक क्रिप्टो बाजार 800 अब्जच्या खाली जाऊन 795.83 अब्ज डॉलर वर आला आहे. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅपनुसार, मागील चोवीस तासांत 0.02 टक्क्यांची घसरण झाली आहे.
एकीकडे क्रिप्टो बाजारात असे चित्र असताना, भारतीय क्रिप्टो बाजारात मात्र दिलासादायक चित्र दिसून येत आहे. सर्वच नाण्यांचा काही अंशी दर वाढला आहे, किंमतीत घसरण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मागील चोवीस तासांमध्ये बिटकॉईन (Bitcoin) नाण्याच्या किंमतीत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस भारतीय क्रिप्टोबाजार गुंतणुकदारांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकेल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
- बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 601 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.28 टक्क्यांची वाढ झाली आहे. तब्बल पाच दिवसांनी ही वाढ पाहायला मिळत आहे. वाढीचे प्रमाण कमी असले, तरी कुठेतरी किंमत खालावत नाही आहे, याचा गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.15 लाख एवढा आहे.
- इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांमध्ये 0.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल, 29 डिसेंबर रोजी एवढ्याच प्रमाणात घसरण झाली होती आणि आज तेवढीच वाढ झाल्याचे दिसत आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 197 युएस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती.
वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.03 लाख एवढा आहे. - डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.07054 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 0.05 टक्क्यांनी वाढला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.20 रुपये एलढी आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 1.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या नाण्याचा दर दोन दिवस वाढतो आणि पुन्हा काही दिवस घटतो, असे चक्र सध्या सुरू आहे. तर या नाण्याची किंमत 67.11 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 655 रुपये आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3383 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 1.91 टक्क्यांनी घटला आहे. कालच्या तुलनेत आज किंमतीत घट होण्याचा दर 2.73 टक्क्यांनी कमी झाला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 28.66 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 1.05 टक्क्यांची घसरण झाली असून, याची किंमत 9.60 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 827 रुपये एवढी आहे. काल या नाण्याचा दर तब्बल 8.31 टक्क्यांनी घसरला होता. मात्र आज यात 7.26 टक्के कमीने घसरण झाल्याचे दिसून येत आहे.