जगातील सर्वांत महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने ठरवून 17 हजार डॉलरचा आकडा पार करत तीन आठवड्यांच्या रेंजमधून बाहेर पडल्याचे दिसून आले. तर या आठवड्यात गुंतवणुकदारांचे लक्ष हे डिजिटल करन्सी ग्रुप, ट्रॉन, हुओबी आणि सोलाना याकडे असणार आहे. अमेरिकेमध्ये बऱ्याच सर्व्हिसेसचा व्यवसाय मंदावत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6 जानेवारी) सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन 17 हजार डॉलरवर पोहोचली होती.
बिटकॉईन 17 हजार डॉलरच्यावर जाण्यापूर्वी त्याच्या एक दिवस आधी बिटकॉईन 16,800 डॉलर्सवर ट्रेड करत होती. पण फेडरल रिझर्व्हने मार्केट कमिटीचे मिनिट्स जाहीर केल्यानंतर मार्केटमधील अस्थिरता वाढली. नोव्हेंबर 2021 मध्ये 69 हजार डॉलर्सवर पोहोचलेल्या बिटकॉईनमध्ये जवळपास 75 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये बिटकॉईन 16,900 वर ट्रेंड करत आहे.
तर दुसरीकडे, इथरियममध्येही गुरुवारी चांगली वाढ दिसून आली होती. पण त्यानंतर थोडीफार अपडाऊन होऊन इथरियमचा ट्रेण्ड तेजीतच होता. सध्या इथर 1,250 डॉलर्सवर ट्रेड करत आहे. इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सीही BTC आणि ETH प्रमाणे ट्रेंडमध्ये दिसून आल्या.
Table of contents [Show]
क्रिप्टोकरन्सीच्या आजच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या कॉईनची किंमत 9 जानेवारीला सकाळी 10 वाजता 17,204.51 डॉलर एवढी होती. मागील 24 तासात या नाण्याच्या किमतीत 1.66 टक्के वाढ झाली. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX) शनिवारी (दि.9 जानेवारी) बिटकॉईनचा दर 14.16 लाख एवढा आहे.
इथरियम (Ethereum)
इथरियम कॉईनच्या किमतीत मागील 24 तासामध्ये 3.67 टक्क्यांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी 10 वाजता याची किंमत 1,304 डॉलर एवढी होती. वझीरएक्सनुसार (WazirX) आज या कॉईनचा भारतीय दर 1.07 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
या कॉईनची किंमत 0.0751 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या कॉईनचा दर मागील 24 तासात 4.56 टक्क्यांनी वाढला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX) डॉजकॉईनची किंमत 6.18 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील 24 तासामध्ये लाईटकॉईनच्या किमतीत 8.27 टक्क्यांनी वाढ झाली. तर या कॉईनची किंमत 81.91 युएस डॉलर होती. भारतीय मूल्यानुसार याची किंमत 6,743 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलानाच्या किमतीत गेल्या 24 तासात 21.49 टक्क्यांची वाढ झाली. याची किंमत 16.11 युएस डॉलर एवढी आहे. तर भारतीय रुपयात याचे मूल्य 1,329.42 रुपये एवढे आहे.