क्रिप्टो मार्केटमधील महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी गुरूवारी (दि. 5 जानेवारी) सकाळच्या सत्रात सुरूवातीला डाऊन ट्रेंडमध्ये दिसत होत्या. कारण क्रिप्टो मार्केटचा कॅप कालच्या दिवसअखेर 1.21 टक्क्यांनी वाढून 820.08 अब्ज डॉलर झाला होता. पण त्यानंतर गेल्या 24 तासात एकूण क्रिप्टो मार्केटचा व्हॉल्यूम 30.28 टक्क्यांनी म्हणजेच 35.35 अब्ज डॉलरने वाढला.
DeFi (Decentralized finance-DeFi) मध्ये एकूण व्हॉल्यूम सध्या 2.19 अब्ज डॉलर आहे, जे एकूण क्रिप्टो मार्केटच्या 24 तासातील व्हॉल्यूमच्या 6.18 टक्के आहे. सर्व स्टेबल कॉईन्सचे प्रमाण आता 32.90 अब्ज डॉलर आहे. जे क्रिप्टो मार्केटच्या तुलनेत 93.07 टक्के आहे.
Coinmarketcap नुसार, Bitcoin, या जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सीची किंमत सुमारे 14.38 लाख रुपये असून बिटकॉईन डॉमिनन्स 39.94 टक्के आहे, ज्यात दिवसभरात 0.19 टक्क्यांची घट दिसून आली. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय (ISM) मॅनेजमेंटचा मॅन्युफॅक्चरिंगसाठी खरेदी व्यवस्थापक निर्देशांक डिसेंबरमध्ये 48.4 पर्यंत घसरला, त्याची सलग दुसरी मासिक घसरण 50 च्या खाली रीडिंग दर्शवते की उत्पादन क्षेत्र संकुचित होत आहे. याबाबत बर्याच अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की, नोकऱ्यांमधील वाढ किंवा नोकरभरती मंदावल्याने याचा जास्त रिस्क असणाऱ्या अॅसेट्सना फायदा होतो. पण त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावते आणि महागाई कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
Table of contents [Show]
महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीच्या आजच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 826.50 युएस डॉलर एवढी होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किमतीत 0.80 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय चलनात बिटकॉईनची किंमत 13,98,904.38 रुपये आहे.
इथेरियम (Ethereum)
इथेरियमची किंमत 1253.44 डॉलर्स एवढी असून त्यामध्ये 3.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.03 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
डॉजकॉईन या नाण्याची किंमत 0.0737 युएस डॉलरवर सकाळी ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 1.60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.08 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 0.85 टक्क्यांनी घसरला आहे. तर या नाण्याची किंमत 75.85 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 6 हजार 282 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलाना नाण्याच्या किमतीत मागील चोवीस तासांत 1.35 टक्क्यांची घसरला असून, याची किंमत 13.33 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 1102.81 रुपये एवढी आहे.