क्रिप्टो मार्केटमधील प्रमुख क्रिप्टोकरन्सी बुधवारी सकाळी (दि. 4 जानेवारी) डाऊन होत्या. म्हणजेच त्या लाल रंगात ट्रेडिंग करत होत्या. मंगळवारी (दि. 3 जानेवारी) जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 0.54 टक्क्यांनी वाढून 809.35 बिलियन डॉलर्स एवढा झाला होता. तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण क्रिप्टो मार्केटचा व्हॉल्यूममध्ये 12.75 टक्के वाढ झाली होती.
DeFi मध्ये एकूण व्हॉल्यूम सध्या 1.92 बिलियन डॉलर आहे. जो एकूण क्रिप्टो मार्केटच्या 24 तासाच्या व्हॉल्यूमच्या 7.20 टक्के आहे. सर्व स्टेबलकॉईन नाण्यांचे प्रमाण आता 24.85 बिलियन डॉलर्स आहे. जे एकूण क्रिप्टो मार्केटच्या 24 तासाच्या व्हॉल्यूमच्या 93.30 टक्के आहे. Coinmarketcap नुसार, Bitcoin, ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी मानली जाते. तिची किंमत सुमारे 14.24 लाख रुपये असून बिटकॉईन डॉमिनन्स 39.76 टक्के आहे, ज्यामध्ये दिवसभरात 0.10 टक्क्यांची घट दिसून आली.
Table of contents [Show]
बँकमन-फ्राईड यांची कोर्टाला विनंती
दरम्यान, मंगळवारी सॅम बँकमन-फ्राईड यांनी FTX आणि इतर मनी लॉण्डरिंगमध्ये दोषी नसल्याचे कोर्टासमोर म्हटले. तसेच त्याच्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या आरोपांसाठी दोषी धरू नये, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली. दक्षिण कोरियाच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे माजी अध्यक्ष बिथंब ली जंग-हून यांना मंगळवारी सोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने निर्दोष घोषित केले. फसवणूक आणि विशिष्ट आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या शिक्षेवर कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपांसाठी जंग-हूंवर खटला चालू होता. हा खटला ऑक्टोबर 2018 चा आहे. कॉस्मेटिक सर्जरी कंपनी BK ग्रुपचे चेअरमन किम ब्युंग-गन यांच्याकडून बिथंब विकत घेण्यासाठी वाटाघाटी दरम्यान फसवल्याचा जंग-हूनवर आरोप होता. या घटनांचा परिणाम क्रिप्टो मार्केटवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सीच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 852.50 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.54 टक्क्यांची घसरण दिसून आली. भारतीय चलनात बिटकॉइनची किंमत १३९६८०३.८५ रुपये आहे.
इथेरियम (Ethereum): या क्रिप्टो नाण्याच्या किंमत 1247.46 डॉलर्स एवढी असून त्यामध्ये 0.72 टक्क्यांची घसरण दिसून आली. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.03 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
डॉजकॉईन या नाण्याची किंमत 0.0724 युएस डॉलरवर सकाळी ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 2.96 टक्क्यांनी घसरला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 5.99 रुपये आहे.
लाइटकॉईन (Litecoin)
मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 1.04 टक्क्यांनी घसरला आहे. तर या नाण्याची किंमत 75.33 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 6 हजार 238 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलाना नाण्याच्या किमतीत मागील चोवीस तासांत 9.01 टक्क्यांची वाढ झाली असून, याची किंमत 12.85 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 1064 रुपये एवढी आहे.