बिटकॉईन आणि इथर या दोन क्रिप्टोकरन्सीने त्यांचा 2022 मधील नॉस्टॅल्जिया टूर सुरू ठेवत या दोन क्रिप्टोकरन्सींने डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यापर्यंत जे स्थान गाठले होते. ते स्थान आज पुन्हा गाठल्याचे पाहण्यास मिळाले. सध्या सुरू असलेल्या Layoff च्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोमार्केट जोरदार प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा होती. पण मार्केटने तेवढ्या पटीत रिस्पॉन्स दिला नाही.
बिटकॉईन अलीकडेच सुमारे 16,850 डॉलर्सवर ट्रेड करत होता. 2023च्या सुरुवातीच्या आर्थिक निर्देशकांचा विचार करता आणि यूएस फेडरल रिझर्व्हने 2023 च्या पहिल्या टप्प्यात व्याजदर वाढवण्याचा इशारा देऊनही गेल्या 24 तासात बिटकॉईनमध्ये कोणतीच मूव्हवेंट पाहायला मिळाली नाही. इथरनेही असाच काहीसा प्रतिसाद दिला. एकूण क्रिप्टो मार्केटचे भांडवल पाहिले तर ते 849 बिलियन युएस डॉलर इतके होते.
ADA, कार्डानो ब्लॉकचेनचे टोकन, 1.8 टक्क्यावर ट्रेडिंग करत होते. तर क्रिप्टोची कामगिरी मोजणारा निर्देशांक CoinDesk मार्केट इंडेक्स (CDI) गुरूवारी (दि.5 जानेवारी) 0.19 टक्के खाली आला होता. CoinDesk TVच्या फर्स्ट मूव्हर प्रोग्रामच्या मुलाखतीत, फेअरलीड स्ट्रॅटेजीजच्या केटी स्टॉकटनने बिटकॉईन आणि ऑल्टकॉईन (Bitcoin & Altcoin) मधील डाऊनट्रेंड नोंदवला.
Table of contents [Show]
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 6 जानेवारीला सकाळी 10 वाजता 16,804.80 युएस डॉलर एवढी होती. मागील 24 तासात या नाण्याच्या किमतीत 0.20 टक्के घसरण झाली. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX) शुक्रवारी (दि.6 जानेवारी) बिटकॉईनचा दर 13.88 लाख एवढा आहे.
इथरियम (Ethereum)
इथरियम नाण्याच्या किमतीत मागील 24 तासांमध्ये 0.40 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सतत काही अंशांनी वाढत असलेल्या या नाण्याची किंमत आज घसरली. याची शुक्रवारी सकाळी 10 वाजता 1,249 युएस डॉलर एवढी किंमत सुरू होती. वझीरएक्सनुसार (WazirX) आज या नाण्याचा भारतीय दर 1.03 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
या नाण्याची किंमत 0.0711 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील 24 तासात 3.76 टक्क्यांनी घसरला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX) डॉजकॉईनची किंमत 5.88 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील 24 तासांमध्ये या नाण्याच्या दरात 2.77 टक्क्यांनी घसरला. तर या नाण्याची किंमत 73.94 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 6,113 रुपये आहे. या नाण्याच्या किमतीत एक वाढ तर एक दिवस घसरण असे चित्र आठवडाभर दिसून येत आहे.
सोलाना (Solana)
सोलानाच्या किमतीत गेल्या 24 तासां 1.51 टक्क्यांची घसरण झाली. याची किंमत 13.17 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 1,088.25 रुपये आहे.