Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Finance Influencers: आर्थिक सल्ले देणाऱ्यांनो सावधान! सेबीची तुमच्यावर करडी नजर

Guideline for Finance Influencers

Image Source : www.inc42.com

Finance Influencers: सोशल मिडियावर रील आणि युट्यूबच्या माध्यामातून आर्थिक सल्ले देणाऱ्या सल्लागारांवर सेबीची करडी नजर असणार आहे. सेबीने याबाबात गाईडलाईन तयार केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ASCI वर असणार आहे.

Guideline for Finance Influencers: सोशल मिडियावर रील आणि युट्यूबच्या माध्यामातून आर्थिक सल्ले देणाऱ्या Financial Influencers वर सेबीच्या संगनमताने अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडिया (Advertising Standards Council of India-ASCI) लक्ष ठेवून असणार आहे.

आस्कीने (Advertising Standards Council of India-ASCI)ने Finfluencersसाठी गाईडलाईन तयार केल्या आहेत. या गाईडलाईन अंतर्गत शेअर्स किंवा गुंतवणुकीबाबत तुम्हाला जाहीररीत्या माहिती देता येणार नाही. जर तुम्हाला अशाप्रकारची माहिती द्यायचीच असेल तर तुम्ही सेबीकडे अधिकृतरीत्या नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ही माहिती  देताना सेबीने दिलेला रजिस्ट्रेशन नंबर, संबधित व्यक्तीचे नाव आणि त्याची पात्रता जाहीर करणे बंधनकारक असणार आहे.

शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीसोबत इतर विषयांबाबत सल्ला देताना Influencersना त्या त्या विषयाशी संबंधित आवश्यक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे की, इन्शुरन्सविषयी माहिती देताना ईर्डाने (Insurance Regulatory & Development Authority-IRDAI) लागू केलेले इन्शुरन्स लायसन्स, चार्टर्ड अकाऊंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS) आदी बेसिक पात्रता असायला हवी. तसेच संबंधित संस्थांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या पात्रता पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

Fininfluencersसाठी नवीन गाईडलाईन्स

शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीबाबत सोशल मिडियावर सल्ला देणाऱ्या व्यक्तीकडे सेबी रजिस्ट्रेशन नंबर असायला हवा. तसेच त्याचे नाव, नंबर, पात्रता आदी माहिती ठळकपणे दिसायला हवी.

बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिस आणि इन्शुरन्स म्हणजेच (BFSI) क्षेत्राशी संबंधित कंटेट बनवण्याची परवानगी असणे आवश्यक आहे.

आर्थिक गोष्टींशी माहिती देताना त्या विषयातले विशेष शिक्षण (CA, CS etc.) असणे आवश्यक.

इन्शुरन्सशी संबंधित माहिती देताना किंवा हेल्थ पॉलिसीबद्दल सांगताना IRDAIच्या गाईडलाईन्स पाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स लायसन्स असणे आवश्यक असणार आहे.

गुंतवणूक व इन्शुरन्सबाबत एखादा Influencers जाहिरात करेल असेल तर तिथे 'जाहिरात' असा शब्द वापरणे आवश्यक आहे.