Best Investment Options In India : स्मार्ट गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत पैसे दुप्पट करु शकतात. ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.
भारतातील गुंतवणूकीच्या उत्तम पर्यायांचा विचार केला तर लोकांच्या मनात अनेक प्रश्न घोळतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला भारतातील सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करण्याची इच्छा असते की त्यांना कमीतकमी जोखीम असलेल्या विशिष्ट कार्यकाळात जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. हेच कारण आहे की गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत चांगले रिटर्न्स देताता आणि ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.
गुंतवणूकीचे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण (Classification Of Investments Into Two Categories)
प्रत्यक्षात, परतावा आणि जोखीम थेट एकमेकांच्या प्रमाणात असतात, याचा अर्थ असा आहे की जोखीम जितकी जास्त असेल तितकी परताव्याची शक्यता जास्त असेल. भारतात, गुंतवणूकीच्या पर्यायांचे ढोबळमानाने आर्थिक आणि बिगर-वित्तीय मालमत्ता अशा दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. आपण वित्तीय मालमत्तांची आणखी विभागणी म्युच्युअल फंड, लाइव्ह स्टॉक्स इत्यादी बाजाराशी निगडीत सिक्युरिटीज आणि बँक एफडी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), बँक आरडी इत्यादी निश्चित उत्पन्न उत्पादनांमध्ये करु शकतो. बिगर वित्तीय मालमत्तांमध्ये सोन्याची गुंतवणूक, स्थावर मालमत्ता, ट्रेझरी बिल इत्यादींचा समावेश होतो.
गुंतवणुकीमधील जोखीम (Risks in Investment)
गुंतवणूक योजना निवडताना गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराच्या रिस्क प्रोफाइलला उत्पादनाच्या संबंधित जोखमीशी जुळवून घेणे अपरिहार्य असते. बाजारात काही गुंतवणूक योजना आहेत ज्यात उच्च जोखमीचा समावेश आहे. परंतु इतर मालमत्ता वर्गांच्या तुलनेत दीर्घकालीन फायदेशीर परतावा मिळविण्याची क्षमता देखील आहे. याउलट गुंतवणूकीच्या काही पर्यायांमध्ये जोखीम कमी असते, पण परतावाही कमी असतो.
गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय (Top Investment Options in India)
खाली देण्यात आलेले भारतातील 2022 मधील काही सर्वोत्कृष्ट गुंतवणूकीचे पर्याय आहेत जे उच्च परतावा देतात. भविष्यासाठी बचत करताना या गुंतवणूक योजनांचा आपल्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये समावेश करण्याचा विचार करू शकता.
गुंतवणूक पर्याय
किमान कालावधी
कोण करु शकते गुंतवणूक
जोखीम/धोके
रिटर्न्स
डायरेक्ट इक्विटी (Direct Equity)
शून्य
रिस्क आणि रिटर्न्स बॅलन्स करु शकणारा गुंतवणूकदार
उच्च
शून्य ते कितीही
म्युच्युअल फंड (Mutual Fund) ई
ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक इन कालावधी
मध्यम ते उच्च जोखमीसाठी तयार असणारा गुंतवणूकदार
उच्च पेक्षा थोडे कमी
मार्केट - लिंक्ड
राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme)
शून्य
सेवानिवृत्तीच्या योजनांच्या प्रतीक्षेत असलेला गुंतवणूकदार
उच्च पेक्षा थोडे कमी
मार्केट – लिंक्ड (8 ते 10 टक्के)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF – Public Provident Fund)
15 वर्षे
दीर्घकालीन गुंतवणूक उद्दीष्टे असणारा गुंतवणूकदार
शून्य
7.10%
बँक मुदत ठेवी (bank Fixed Deposit)
7 दिवस
जो जोखीम घेऊ इच्छित नाही किंवा इक्विटीची जोखीम न घेणारा
शून्य
फिक्स्ड रिटर्न्स, बँकांचे वेगळे दर
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS – Senior Citizen Saving Scheme)
5 वर्षे
ज्येष्ठ नागरिक
शून्य
7.9%
रियल इस्टेट (Real Estate)
60 वर्षे
कोणीही
मध्यम
15-19%
गोल्ड इटीएफ (Gold ETF)
शून्य
कोणीही
मध्यम पेक्षा थोडे कमी
मार्केट-लिंक्ड
आरबीआय बॉंड (RBI Bond)
60 वर्षे
भारतीय नागरिक
शून्य
7.75%
प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)
10 वर्षे
ज्येष्ठ नागरिक
शून्य
7.4%
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP – Unit Linked Insurance Plan)
45 वर्ष किंवा 45 वर्षांपेक्षा कमी
संपत्ती निर्मिती आणि लाइफ कव्हरसाठी उत्सुक गुंतवणूकदार
उच्च
गुंतवणूकदाराच्या प्रोफाइलवर अवलंबून
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS)
60 वर्षे
भारतीय नागरिक
शून्य ते कमी
7.7%
प्रारंभिक पब्लिक ऑफरिंग्स (IPO – Initial Public Offerings)
शून्य
गुंतवणूकदाराकडे डीमॅट कम ट्रेडिंग खाते असणे आवश्यक
FD Laddering Technique: एफडी हा सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. तर, एफडीमध्ये चांगला परतावा मिळावा आणि एकाचवेळी पैसे ब्लॉक होऊ नये म्हणून गुंतवणूक तज्ज्ञ एफडी लॅडरींग प्रणाली वापरण्याचा सल्ला देतात, मात्र हे एफडी लॅडर आहे तरी काय, हे आपण या लेखातून समजून घेऊयात.
Hindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचे गंभीर आरोप करत हिंडेनबर्ग या वित्तविषयक संशोधन संस्थेनं खळबळ उडवून दिली आहे. अदानी समुहाने आरोप फेटाळले आहेत. आणि कायदेशीर कारवाईची शक्यता तपासून पाहायला सुरूवात केली आहे. पण, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाचे शेअर जोरदार कोसळले आहेत.
MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.