नवीन वर्षात गुंतवणूकदारांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इक्विटी फंडांच्या कामगिरीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वर्षभरात काही फंडांनी दमदार परतावा दिला तर काहींनी गुंतवणूकदारांचे नुकसान केले. यात कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज डायरेक्ट फंड, कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप डायरेक्ट फंड, मिरे अॅसेट इमर्जिंग डायरेक्ट फंड, इन्वेस्को इंडिया लार्ज-कॅप डायरेक्ट फंड या योजनांमधून वर्षभरात गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागले आहे. वर्ष 2023 मध्ये मागील वर्षात दमदार कामगिरी केलेल्या इक्विटी फंड योजनांची माहिती घेऊया.
Table of contents [Show]
- आयसीआयसीआय प्रु. इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंड (ICICI Pru Infrastructure Direct Fund)
- आदित्य बिर्ला मिडियम टर्म डायरेक्ट फंड: (ABSL Medium Term Direct Fund)
- बँक ऑफ इंडिया कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड डायरेक्ट (Bank of India Conservative Hybrid Fund)
- क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट (Quant Mid Cap Fund Direct)
- Tata Banking & Financial Services Fund Direct (टाटा बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड डायरेक्ट)
आयसीआयसीआय प्रु. इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंड (ICICI Pru Infrastructure Direct Fund)
आयसीआयसीआय प्रु. इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंडाने वर्षभरात गुंतवणूकदारांना 29.60% परतावा दिला आहे. एसआयपी गुंतवणूकदारांसाठी, या फंडाने दमदार परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी मागील वर्षभर आयसीआयसीआय प्रु. इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंडात एसआयपी केली त्यांना 32.27% रिटर्न्स मिळाले. आयसीआयसीआय प्रु. इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंडाचा एक्सपेन्स रेशो 1.66% इतका आहे.
आदित्य बिर्ला मिडियम टर्म डायरेक्ट फंड: (ABSL Medium Term Direct Fund)
आदित्य बिर्ला मिडियम टर्म डायरेक्ट फंड ही इक्विटी फंड प्रकारातील गुंतवणूक योजना आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 25.73% परतावा दिला. SIP गुंतवणूकदारांनी या फंडातून26 % परतावा कमावला. या इक्विटी फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.81% इतके आहे.
बँक ऑफ इंडिया कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड डायरेक्ट (Bank of India Conservative Hybrid Fund)
बँक ऑफ इंडिया कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 22%हून अधिक परतावा दिला आहे. SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंड योजनेने 14.30% परतावा दिला आहे. या हायब्रीड फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.79 आहे.
क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट (Quant Mid Cap Fund Direct)
क्वांट मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट स्किममधून गेल्या वर्षात गुंतवणूकदारांना 20 % परतावा दिला आहे. या फंडात एसआयपी मोडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला त्यांच्या पैशावर सुमारे 22.35% परतावा मिळाला आहे. मात्र या फंडाचा एक्सपेन्स रेशो 0.63% इतका आहे.
Tata Banking & Financial Services Fund Direct (टाटा बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड डायरेक्ट)
टाटा बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड डायरेक्ट फंडाची एक वर्षाची कामगिरी पाहिली तर या फंड योजनेने गुंतवणूकदारांना मागील एक वर्षात 18.80% परतावा दिला आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 32%हून अधिक दमदार परतावा दिला आहे. या इक्विटी फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.58% इतके आहे.