जानेवारी सुरु झाला की नोकरदारांची कर बचतीसाठी धावपळ सुरु होते. विमा पॉ़लीसी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक, बॉंड किंवा पोस्टाची योजना याचा विचार केला जातो. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात कर बचतीचे पर्याय शोधत असाल तर कर-बचतीचे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करु शकता.
टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) तुम्हाला सेक्शन अंतर्गत आयकर वाचविण्यात मदत करतात.प्राप्तिकर कायद्याचे कलम 80C आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ देतो.
टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) तुम्हाला आयटी कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर वाचविण्यात मदत करतात. तुम्ही ELSS मध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख गुंतवू शकता आणि प्रत्येक आर्थिक वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा करू शकता. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड किंवा ईएलएसएस स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना खूप धोका असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराने या जोखीमेबाबत जागरुक असणे आवश्यक आहे.
2023 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ELSS म्युच्युअल फंड:
- अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड
- कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड
- मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर फंड
- इन्वेस्को इंडिया टॅक्स प्लॅन फंड
- डीएसपी टॅक्स सेव्हर फंड
- क्वांट टॅक्स प्लॅन
(डिसक्लेमर: शेअर बाजार/ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स/म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)