Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Investment: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ही’ आहे बेस्ट स्ट्रॅटजी

Cryptocurrency Investment strategy

Image Source : https://www.freepik.com/

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जी-20 परिषदेत देखील याबाबत जागतिक पातळीवर नियमावली तयार करण्याबाबत चर्चा झाली.

जगभरात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय म्हणून समोर येत आहे. मात्र, जागतिक स्तरावर क्रिप्टोकरन्सीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही ठोस अशी नियमावली नाही. अनेक देश असेही आहेत, ज्यांनी या आभासी चलनाला अद्याप मान्यता दिलेली नाही. भारताने देखील यावर थेट बंदी घातली नसली तरीही याच्या कायदेशीर वापराला देखील परवानगी दिलेली नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरते. क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे देखील समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 परिषदेत देखील यावर चर्चा झाली. तुम्ही देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर यासाठी कोणती स्ट्रॅटर्जी बेस्ट असेल? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची बेस्ट स्ट्रॅटजी

दीर्घकालीन गुंतवणूकक्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही अस्थिर समजली जाते. कारण, याच्या किंमतीत अवघ्या कमी कालावधीत मोठा चढ-उतार पाहायला मिळतो. मात्र, तुम्ही जर दीर्घकालावधीच्या उद्देशाने यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्कीच यात फायदा मिळू शकतो. परंतु, या स्ट्रॅटजीसाठी तुमच्याकडे संयम असणे अत्यंत गरजेचे आहे. 
पोर्टफोलियोमध्ये ठेवा विविधकोणत्याही गुंतवणुकीमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. जेणेकरून, जोखीम कमी होते. क्रिप्टोकरन्सीला देखील हे लागू पडते. तुम्ही वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी, टोकन्समध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमचे भविष्यात नुकसान कमी होईल.
डॉलर-कॉस्ट एव्हरेजिंग स्ट्रॅटजीक्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी Dollar-cost averaging देखील एक लोकप्रिय स्ट्रॅटजी आहे. यामध्ये तुम्हाला ठराविक अंतराने विशिष्ट रक्कम क्रिप्टोमध्ये गुंतवावी लागते. टप्प्याने टप्प्याने गुंतवणूक केल्याने जोखीम देखील कमी होते व भविष्यात गुंतवणूक एका समान पातळीवर येऊन फायदा होतो.
ट्रेंड अँड रिसर्चक्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जागतिक पातळीवर नक्की काय ट्रेंड सुरू आहे याची माहिती घ्या. कोणत्या चलनाची किंमत किती आहे? कोणते चलन अस्थिर आहे? मागील 6 महिन्यात किंमतीत किती चढ-उतार झाला आहे? ही सर्व माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करताना मदत होईल. तसेच, क्रिप्टोकरन्सीची खरेदी-विक्री करताना योग्य ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. 

जी20 आणि क्रिप्टोकरन्सी

सध्या जागतिक पातळीवर क्रिप्टोकरन्सीसाठी कोणतीही नियमावली नाही. क्रिप्टोकरन्सीचे मुल्य हे बाजारातील चढ-उतार, गुंतवणुकादारांनुसार ठरते. विशेष खासगी कंपन्यांचे यावर नियंत्रण पाहायला मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 परिषदेत देखील यावर चर्चा झाली.

या शिखर परिषदेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि फायनेंशियल स्टॅबिलिटी बोर्डद्वारे एक मसुदा सादर करण्यात आला. परिषदेत सादर करण्यात आलेल्या मसुद्यानुसार क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. Crypto-Asset Reporting Framework (CARF) मुळे क्रिप्टोकरन्सीचा गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल. थोडक्यात, जगभरातील क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात यावर बंदी येण्याऐवजी याच्या व्यवहारासाठी ठोस नियमावली तयार केली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यात विचारपूर्वक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

क्रिप्टोकरन्सी भारताची भूमिका 

भारताने क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घातलेली नाही. परंतु, कायदेशीर मान्यता देखील नाहीय आरबीआयने वारंवार यावर बंदी घालण्याची मागणी केली असून, हा ‘जुगार’ असल्याचे देखील म्हटले आहे. सरकारने याच्या व्यवहारावर 30 टक्के कर लावला आहे.