Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Ideas: महिलांनो, कमी गुंतवणुकीत घरातूनच सुरू करा 'हे' व्यवसाय; कमाई हजारो रुपये

Business Ideas

Image Source : https://www.freepik.com/

महिला घरच्या घरी कमी गुंतवणुकीत अनेक चांगले व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई होईल.

महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या केवळ नोकरीच करत नाहीयेत तर व्यवसाय देखील अगदी उत्तमरित्या चालवत आहेत. महिला स्वतःचा व्यवसाय चालवत असल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होते. या लेखातून अशाच काही व्यवसायांबाबत जाणून घेऊया, जे अगदी कमी खर्चात सुरू करणे शक्य आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

महिलांनो, तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असाल तर सर्वातआधी तुमची आवड, कौशल्य व तुमच्याकडे असलेला मोकळा वेळ याचा विचार करा. अनेक महिलांवर घर, कुटुंब व मुलांची जबाबदारी असल्याने व्यवसायासाठी पूर्णवेळ देता येत नाही. त्यामुळे योग्य व्यवसायाची निवड करणे गरजेचे आहे. तुम्ही जर व्यवसायासाठी पूर्णवेळ देऊ शकत असाल, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे.

याशिवाय, व्यवसायात उतरण्याआधी त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. भांडवलाची गरज, जागा, ग्राहक क्षमता अशी संपूर्ण माहिती घेऊन तुमच्या व्यवसायासाठी एक प्लॅन तयार करा. घरच्या घरी सुरू करता येणारेही अनेक व्यवसाय आहेत, त्याबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

महिला सुरू करू शकतात हे व्यवसाय

फ्रीलान्सिंग

तुम्ही जर शून्य गुंतवणुकीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर फ्रीलान्सिंग काम करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही इतरांसाठी लेख लिहिणे, व्हीडिओ एडिटिंग, डिझाइन सारखी काम घरबसल्या करू शकता. 

याचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला हे काम करण्यासाठी कोठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता व यातून महिन्याला हजारो रुपये कमाई करणे शक्य आहे. तसेच, तुमच्याकडे ग्राफिक डिझाइन अथवा वेब डेव्हलपमेंटसारखी काम असल्यास इतरांनाही नोकरी देऊ शकता. 

शिकवणी (Home Tutoring) 

तुम्ही जर कोणतीही गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर शिकवणी हा चांगला पर्याय आहे. यासाठी केवळ तुमच्याकडे जागा असणे गरजेचे आहे. तुम्ही घरीच शिकवणी सुरू करू शकता. तुमच्या भागात राहणाऱ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना सहज शिकवू शकता. याशिवाय, तुम्ही जर एखाद्या विषयात तज्ञ असाल तर दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना देखील शिकवू शकता. जसजसे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, तसे तुमची कमाई देखील वाढेल. थोडक्यात, कोणतीही गुंतवणूक न करता यातून महिन्याला 20 ते 30 हजार रुपयांची कमाई करणे शक्य आहे. 

हस्तकला व्यवसाय 

तुम्हाला जर आकर्षक वस्तू बनवता येत असतील तर हस्तकला व्यवसाय सुरू करण्याचा नक्कीच विचार करू शकता. तुम्ही घरबसल्या आकर्षक दागिने, ग्रिटिंग कार्ड्स, शिवणकाम केलेल्या टोप्या किंवा बॅग्स, मेणबत्ती व हटके डिझाइनचे शर्ट तयार करू शकता. या वस्तूंची ऑनलाइन देखील विक्री करता येईल. त्यामुळे तुम्हाला जर हटके व आकर्षक वस्तू बनवता येत असतील तर या व्यवसायाचा नक्कीच विचार करा.