Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI-क्रेडिट कार्ड लिंक करावे की नाही? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

UPI

Image Source : https://www.freepik.com/

आरबीआयने क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करण्यापूर्वी याचे फायदे तोटे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतात यूपीआय अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी 5 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतच्या आर्थिक व्यवहारासाठी यूपीआयचा वापर केला जातो. मात्र, यूपीआय अ‍ॅप्सच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड व बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे. नुकतेच आरबीआयने क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करण्यापूर्वी याचे फायदे तोटे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

UPI-क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे फायदे

कोणत्याही अडथळ्याशिवाय करा व्यवहार – यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही कोठूनही 24/7 आर्थिक व्यवहार करू शकता. अनेकदा बँक खाते अथवा डेबिट कार्डशी कोणतीही समस्या असल्यास यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे शक्य होत नाही. याशिवाय, तुमच्या बँक खात्यात जेवढी रक्कम आहे, तेवढेच खर्च करता येत असे. परंतु, या नवीन सुविधेमुळे तुम्ही क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट आहे, तेवढे व्यवहार करता येईल.

सुरक्षित व्यवहार – यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. ही सिस्टम टू फॅक्टर ऑथेंटिकेशनवर काम करते, ज्यामुळे व्यवहार करणे सोपे जाते. तसेच, क्रेडिट कार्ड देखील सिक्युरिटी फीचर्ससह येतात. त्यामुळे UPI-क्रेडिट कार्ड लिंक केल्यास तुम्ही कोणत्याही फसवणुकीशिवाय सुरक्षित व्यवहार पूर्ण करू शकता.

रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक – यूपीआयची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड-युपीआय लिंक केल्यास क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात प्रचंड वाढ होईल. अशावेळी कंपन्यांकडून ग्राहकांना अधिकाधिक व्यवहार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे कॅशबॅक व रिवॉर्ड्स देखील मिळतील. अशाप्रकारे, ग्राहकांना यूपीआय अ‍ॅप व क्रेडिट कार्ड कंपनी दोन्हीकडून कॅशबॅक व रिवॉर्ड्सचा फायदा मिळेल.

UPI-क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे तोटे 

जास्त खर्च – सध्या युपीआयच्या माध्यमातून दिवसाला 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करतात. ते देखील तुमच्या खात्यात पैसे असतील तरच व्यवहार करणे शक्य होते. मात्र, UPI-क्रेडिट कार्ड लिंक केल्याने अतिरिक्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. क्रेडिट लिमिट जास्त असल्याने आपण जास्त खर्च करतो. यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

व्याजदर जास्त – UPI-क्रेडिट कार्ड लिंकचा सर्वाधिक मोठा तोटा हा अनावश्यक खर्च आहे. यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात तर अडकू शकताच, सोबतच वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास तुमच्याकडून जास्त व्याजदर आकारले जाऊ शकते. कोणत्याही कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंटच्या तुलनेत हे व्याजदर नक्कीच जास्त असेल.

क्रेडिट स्कोरवर परिणाम – योग्य काळजी न घेतल्यास UPI-क्रेडिट कार्ड लिंकमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. UPI वापरण्यास खूपच सोपे व सोयीचे असल्याने यामुळे जास्त पैसे खर्च करण्याची सवय लागते. अशावेळी तुमच्याकडून क्रेडिट कार्डचा जास्त वापर केला जाऊ शकतो व वेळेवर कार्डचे बिल न भरल्यास क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे भविष्यात कर्ज काढताना देखील अडचणी येऊ शकतात.