Gold ETF Investment : सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold Exchange Traded Fund-ETF) उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्या ईटीएफमध्ये गुंतवणूक (Investment in ETF) करायची असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडू शकतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही बेसिक पॅरामीटर्स पाहून गुंतवणूकादर गुंतवणूक करू शकतो. तर आज आपण अशाच बेसिक पॅरामिटर्सची माहिती घेणार आहोत.
गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या गोल्ड ईटीएफ योजना (Gold ETF Schemes) उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्याही एखाद्या योजनेत गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो. कारण बहुतांश सर्व कंपन्यांची गोल्ड ईटीएफ योजना समानच आहे. तसेच सर्व ईटीएफ स्कीमस् समान लाभ देतात. त्यामध्ये सुरक्षितता (Safety and Security), तरलता (लिक्विडिटी) आणि टॅक्समध्ये सवलत अशाप्रकारचे लाभ दिले जातात. पण याव्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, या पॅरामिटर्स व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत. त्या पाहून गुंतवणूकदार योग्य गोल्ड ईटीएफ निवडून त्यात गुंतवणूक करू शकतो.
Table of contents [Show]
कॉर्पस (Corpus)
एका विशिष्ट प्रकारच्या स्किममध्ये होणाऱ्या गुंतवणुकीला कॉर्पस म्हटले जाते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना हाय कॉर्पस व्हॉल्यूम पाहावा. कारण अनेक गुंतवणूकदार यात गुंतवणूक करून याचे यापूर्वीच भाग झालेले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या स्कीममध्ये गुंतवणूक होत असते तेव्हा त्यावर सर्व प्रकारच्या यंत्रणेची आणि गुंतवणूकदारांची नजर असते. त्यामुळे ज्या स्कीममध्ये कॉर्पस अधिक आहे; त्या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.
गुंतवणुकीवरील खर्चाचे प्रमाण (Expense Ratio)
गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवतात. तेव्हा गुंतवणूकदाराला ती गुंतवणूक मॅनेज करण्यासाठी काही खर्च येतो. त्या खर्चाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यातील कमीतकमी खर्च आकारणाऱ्या कंपनीच्या स्कीमचा विचार केला जाऊ शकतो.
कमीतकमी ट्रॅकिंग एरर (Tracking Ratio)
कोणतीही ईटीएफ स्कीम निवडताना ट्रॅकिंग एरर कमीतकमी असावा. हा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्यथा बाजारातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या परताव्यात घट होऊ शकते. जसे की, प्रत्यक्ष सोन्याच्या किमती सातत्याने बदलत असतात. पण त्याचा परिणाम ईटीएफच्या एनएव्हीवर झालेला दिसून येत नाही. त्यामुळे कमीतकमी ट्रॅकिंग एरर असलेली स्कीम निवडावी.
लिक्विडिटी (तरलता) (Liquidity)
बेस्ट गोल्ड ईटीएफची निवड करताना लिक्विडिटी हा खूप महत्त्वाचा मापदंड (पॅरामिटर) मानला जातो. भारतातील बहुतांश ईटीएफ हे लो ट्रेडेड व्हॉल्यूमचे आहेत. अशावेळी मार्केटमध्ये सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या आणि चांगला व्हॉल्यूम असलेल्या गोल्ड ईटीएफची निवड करणे योग्य ठरू शकते.
मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, ईटीएफची लिक्विडिटी निश्चित करण्यासाठी किंवा ती तपासण्यासाठी त्यावर होणारा खर्च जाणून घेतला पाहिजे. हा खर्च म्हणजे गुंतवणूकदार जेव्हा युनीट्स खरेदी किंव विक्री करतो. त्यावर लागू होतो. तो जर कमीतकमी असेल तर तो चांगला आहे.
अशाप्रकारे गुंतवणूक एखाद्या गोल्ड ईटीएफची निवड करू शकतो. पण ही पद्धतही गुंतवणूकादाराला खूपच क्लिष्ट वाटत असेल तर त्याने संबंधित स्कीममधील कॉर्पस, ट्रेडेड व्हॉल्यूम, गुंतवणुकीवरील खर्चाचे प्रमाण अशा बेसिक गोष्टी तपासून ईटीएफची निवड करण्यास हरकत नाही.