Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ETF Investment: 'ईटीएफ'मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, झिरोधाचे प्रमुख नितीन कामथ यांच्या टिप्स फॉलो करा

Nitin Kamath

Image Source : www.adigitalblogger.com www.fortuneindia.com

ETF Investment: गेल्या काही वर्षात भारतात ईटीएफमधील गुंतवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एनएसईच्या वेबसाईटनुसार आजच्या घडीला भारतात 174 ईटीएफ गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

झिरोधा ब्रोकर्स ही भारतातील आघाडीची शेअर ब्रोकिंग कंपनी आहे. एक यशस्वी स्टार्टअपपैकी एक म्हणून झिरोधा ओळखली आहे. झिरोधाचे प्रमुख नितीन कामथ यांनी गुंतवणूकदारांना ईटीएफ अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंडांत गुंतवणूक करण्यापूर्वी काही सल्ले दिले आहेत.

गेल्या काही वर्षात भारतात ईटीएफमधील गुंतवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एनएसईच्या वेबसाईटनुसार आजच्या घडीला भारतात 174 ईटीएफ गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

ईटीएफच्या कामगिरीबाबत नितीन कामथ यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडल्सवरुन काही निरिक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी 'ईटीएफ'चा पर्याय स्वीकारावा, असे म्हटले आहे.

नितीन कामत यांच्यामते मागील पाच वर्षात ईटीएफने दमदार कामगिरी केली आहे. ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना कमी खर्चात जागतिक पातळीवर गुंतवणूक करुन पोर्टफोलिओ तयार करण्याची संधी ईटीएफमधून मिळते, असे कामत यांनी म्हटले आहे.

ईटीएफमधील गुंतवणूक विविध मालमत्ता वर्गात गुंतवली जाते. त्यामुळे गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण बनतो. यात कमॉडिटी, बॉंडस रिअल इस्टेट, करन्सी, स्टॉक यात ईटीएफ गुंतवणूक करतात. यामुळे शेअर बाजारातील अनिश्चिततेपासून गुंतवणूकदाराचे संरक्षण केले जाते.

सध्याच्या घडीला 174 ईटीएफ योजना सुरु असून त्यात एकूण 5 लाख 61 हजार 211 कोटींची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईटीएफकडून 67 इंडेक्स ट्रॅक केले जातात. मात्र ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही मुद्दे लक्षात घ्यायला हवे, असे कामत यांनी म्हटले आहे.

  1. मार्केट सुरु झाल्यानंतर सुरुवातीची 15 ते 30 मिनिटे ट्रेडिंग व्हॉल्यूम खूपच कमी असतो. अशावेळी खरेदी-विक्री टाळणे आवश्यक आहे. 
  2. अनावश्यक ट्रेड टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी मार्केट ऑर्डर्स ऐवजी लिमिट ऑर्डर्सचा पर्याय वापरणे योग्य राहील.
  3.  शेअर बाजारात जेव्हा प्रचंड अस्थिरता असते तेव्हा ईटीएफमध्ये तुम्हाला प्रीमियम किंवा डिस्काउंट रेटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असते, मात्र त्यावेळी नेट असेट व्हॅल्यू पाहणे गरजेचे आहे. 
  4. कोणत्याही ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची ट्रेडिंग हिस्ट्री पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक ईटीएफमध्ये दररोज गुंतवणूक होत असेल असे नाही. एकाच दिवसांत एखाद्या ईटीएफमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली तर त्यामध्ये गुंतवणूक करायला हवी असे नाही. 
  5. ईटीएफमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक (एसआयपी) प्रमाणे गुंतवणूक करता येऊ शकते.