Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सावध रहा !! गुंतवणुकीत फसवणूक (इन्व्हेस्टमेंट फ्रॉड) वाढत आहे.

सावध रहा !! गुंतवणुकीत फसवणूक (इन्व्हेस्टमेंट फ्रॉड) वाढत आहे.

चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका पैसे, असे ओळखा Investment fraud

तुम्ही इतके पैसे भरा त्यावर तुम्हाला इतका परतावा मिळेल यासारखी प्रलोभनं अनेक योजनांद्वारे दिली जातात. या प्रलोभनांमुळे लोक फसतात आणि चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतात. अनेकवेळा ओळखीच्या लोकांनी एखाद्या योजनेत पैसे गुंतवले असल्याने ती योजना योग्यच असेल असा समज होऊन अनेकजण कोणतीही चौकशी न करता स्वतःचे देखील पैसे त्या योजनेत गुंतवतात.                   

इन्व्हेस्टमेंट फ्रॉड (Investment fraud)       

करणाऱ्या काही कंपन्या लोकांना सांगतात की, एखाद्या सर्व्हेसाठी तुम्हाला काही उत्तरं द्यायची आहेत त्यासाठी तुम्हाला चांगली रक्कम दिली जाईल पण सुरुवातीला तुम्हाला काही पैसे भरावे लागतील. पैशांच्या आमिषाला बळी पडून अनेक लोक पैसे भरतात आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपली फसवणूक झाली आहे. अशा अनेक प्रकारच्या फ्रॉडमध्ये लोक पैसे गुंतवत असतात. एखादी स्कीम फ्रॉड आहे की नाही हे कशाप्रकारे ओळखायचे हे आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.                   

तुम्हाला फोन करून अनेकवेळा सांगितले जाते की, तुम्हाला एखादे बक्षीस मिळाले आहे ते घेऊन जा... आणि तिथे भेटायला गेल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या मंडळींकडून सांगितले जाते की, इतके पैसे गुंतवा, तुम्हाला इतक्या महिन्यांनंतर इतका परतावा मिळेल. काही लोकांना हा फ्रॉड असल्याचे लक्षात येते तर काही लोक पैशांच्या हव्यासापोटी पैसे गुंतवतात. आता अशाप्रकारच्या फ्रॉडसोबतच ऑनलाईन फ्रॉडचे देखील प्रमाण वाढले आहे. तुम्ही इतके पैसे जिंकले आहेत असे सांगणारे अनेक मेल्स, मेसेजेस तुम्हाला दिवसाला येत असतात. या मेल्स, मेसेजेसकडे दुर्लक्ष करणे कधीही तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच सध्या अनेक एप्सद्वारे देखील फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे.                   

कोणत्याही नुकसानाशिवाय चांगला परतावा                

तुम्हाला कोणीही कमी काळात कोणत्याही नुकसानाशिवाय तुमच्या पैशांवर चांगला परतावा देऊ शकत नाही. तसेच तुमचे पैसे कमी काळात दुप्पट करू शेकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणीही अशाप्रकारचे आमिष देत असेल तर त्याच्यापासून दूर राहा. आपले उत्पन्न खूपच जास्त असावे, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये, सगळ्या गोष्टी खरेदी करता याव्यात असे प्रत्येकाला वाटत असते आणि लोकांच्या याच गोष्टीचा हे फ्रॉड करणारे लोक फायदा घेतात आणि त्यांना विविध आमिषं दाखवून पैसे गुंतवण्यास तयार करतात.                   

व्यवसायाविषयी कळत नसेल तर                

अनेक कंपन्या आपल्या व्यवसायात तुम्ही गुंतवणूक करा असे लोकांना सांगतात. पण त्यांचा व्यवसाय काय आहे, कशाप्रकारे चालतो याविषयी त्यांना लोकांना योग्यप्रकारे पटवून देता येत नाही. अशा कंपन्यांपासून दूर राहा. तसेच तुम्हाला कोणीही गुंतवणुकीविषयी सांगितल्यास, त्या कंपनीबाबत तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता. त्या कंपनीत कोण कोण गुंतवणुकीदार आहेत हे तुम्हाला यातून कळेल. तसेच ती कंपनी केवळ दोन-तीन वर्षांपूर्वीची असेल तर दाल में कुछ काला है हे लक्षात ठेवा.                   

नवीन गुंतवणुकीदारासाठी जास्त कमिशन              

अनेक गुंतवणुकीच्या स्कीममध्ये तुम्ही नवीन गुंतवणुकीदार आणल्यास तुम्हाला त्यावर चांगले कमिशन दिले जाईल असे सांगितले जाते. अशा गुंतवणुकींमध्ये काही तरी गोंधळ आहे हे समजून घ्या.