Fundamentals of Dividends: एका ऐवजी दोन मार्गांनी नफा मिळत असेल तर याला दुहेरी लाभाचा सौदा म्हणतात. काही कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या वेळी त्यांच्या नफ्यातून, गुंतवणुकदारांना लाभांश अर्थात डेव्हिडंड (Dividend) देतात.
लाभांश म्हणजे काय? (What is dividend?)
शेअर मार्केटच्या जगात अशा काही कंपन्या आहेत ज्या त्यांच्या शेअरधारकांना त्यांच्या नफ्यातील हिस्सा वेळोवेळी देतात. नफ्याच्या स्वरूपात मिळालेल्या या भागाला लाभांश म्हणतात. नफ्यातील किती टक्के रक्कम कंपन्या लाभांश म्हणून देणार त्याला शेअर्सचा लाभांश उत्पन्न स्टॉक (dividend yield stocks) म्हणतात. मात्र, हा लाभांश द्यायचा की नाही, हा निर्णय कोणत्याही कंपनीचा असतो. हा अनिवार्य नियम नाही. पीएसयु (PSU: Public sector undertakings) अर्थात, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बहुतेक त्यांच्या भागधारकांना म्हणजे शेअरधारकांना लाभांश देतात.
लाभांश (dividend) कंपनीच्या उत्पन्नाचा काही भाग त्याच्या भागधारकांच्या वर्गामध्ये वितरित करणे. भागधारकांना मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे निश्चित केली जाते. लाभांश देणार्या कंपन्यांचे भागधारक सामान्यतः जोपर्यंत त्यांनी माजी लाभांश जाहिर होण्याच्या तारखेपूर्वी स्टॉक ठेवला आहे तोपर्यंत ते पात्र असतात. लाभांश रोख स्वरूपात किंवा अतिरिक्त स्टॉकच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे उपक्रमात टाकल्याबद्दल बक्षीस म्हणून लाभांश दिला जातो. डिव्हिडंड पेआउट्स सहसा कंपनीच्या समभागाच्या किंमतीत प्रमाणानुसार वाढ किंवा घट करून घोषित केले जातात.
असा मिळतो दुप्पट नफा! (Double Profit)
कंपनी जो काही नफा कमवत असेल, त्या नफ्यातील हिस्सा कंपनी तुम्हाला देईल. शेअर्समध्ये नेहमीच चढ-उतार होत असतात. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकायला लागतात, त्यामुळे शेअर्सच्या किमती कमी होतात. अशा वेळी तुम्ही कोणत्याही लाभांश स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर अशा नुकसानीमध्येही तुम्ही सुरक्षित राहू शकता.
बाजारासाठी लाभांश देखील चांगला मानला जातो. लाभांश मिळाल्याने बाजारात सकारात्मक येते. उच्च लाभांश देणार्या कंपनीत गुंतवणूक केल्यास, शेअर्स न विकताही अशाप्रकारे तुम्ही भरीव उत्पन्न मिळवू शकता.
लाभांश कधी मिळतो? (When do companies pay dividends?)
कंपनीच्या एका शेअरवर दिलेल्या लाभांशाच्या रकमेला 'प्रति शेअर लाभांश' (Dividend per share) असे म्हणतात. त्याला थोडक्यात डीपीएस (DPS) असेही म्हणतात.जर तुमच्याकडे आयटीसी (ITC) कंपनीचे 200 शेअर्स असतील आणि प्रति शेअर लाभांश रुपये 10 असेल, तर तुमचे लाभांश उत्पन्न रुपये 200 × 10 = 2000 असे होईल.
काही कंपन्या वर्षातून एकदा तर काही दोन ते तीन वेळा लाभांश देतात. प्रति शेअर आधारावर लाभांश दिला जातो. आर्थिक वर्षाच्या शेवटी, कंपनी तिच्या नफ्यातून कर आणि इतर खर्च वजा केल्यावर झालेल्या निव्वळ नफ्यातून भागधारकांना लाभांश दिला जातो.