महाराष्ट्राचा विचार करता सप्टेंबर महिन्यात दहिहंडी (गोपाळकाला), गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी असे महत्त्वाचे सण आहेत. त्याचबरोबर 4 रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार असे दोन दिवस हक्काच्या सुट्ट्या आहेत. या पाहिल्या तर महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील बँका 9 दिवस बंद राहणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी संपूर्ण राज्यात दहिहंडीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
देशपातळीवर वेगवेगळ्या सणासुदींमुळे आणि विविध राज्यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्यांमुळे सप्टेंबर महिन्यात एकत्रितपणे देशातील बँका 16 दिवस बंद असणार आहेत. या बंद असणाऱ्या दिवसांमध्ये सण, रविवार, दुसरा आणि चौथ्या शनिवारच्या सुट्टीचे दिवस आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून तुम्ही सुद्धा या सुट्ट्या पाहू शकता.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या देशभरातील एकूण सुट्ट्यांपैकी तीनच सुट्ट्या महाराष्ट्राला लागू असणार आहे. त्यातील गोपाळकालाची सुट्टी ही मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी जाहीर केली होती. त्याचबरोबर 4 रविवार आणि 2 शनिवार अशा एकूण 9 सुट्ट्या महाराष्ट्रातील बँकांना असणार आहेत. त्यानुसार नागरिकांनी बँकांची कामे पूर्ण केली तर त्यांचे नुकसान होणार नाही.