सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रकडून विविध अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. काही निवडक अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून 100% अर्थसहाय्य केले जाते. यात विद्यार्थ्यांची ट्युशन फि, हॉस्टेलचे शुल्क, पुस्तकांचा खर्च समाविष्ट असतो. जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते.
बँक ऑफ महाराष्ट्राकडून शैक्षणिक कर्जाच्या चार योजना राबवल्या जातात. यात मॉडेल एज्युकेशन लोन स्कीम, महा स्कॉलर एज्युकेशन लोन स्कीम , महा बँक स्कील लोन स्कीम आणि शैक्षणिक कर्जावर व्याज अनुदान योजना अशा प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या विद्या लक्ष्मी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.
शैक्षणिक कर्जासाठी स्टेप्स फॉलो करा
- ज्या शैक्षणिक कर्ज हवे आहे अशा विद्यार्थ्यांना थेट बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करता येईल.
- बँकेच्या वेबसाईटवरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो बँकेच्या शाखेत सादर करता येईल.
- कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे अर्ज, दोन फोटो, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल त्याची माहिती, पॅनकार्ड, आधारकार्ड, पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड, निवासाचा पत्ता, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, पालकांचे मागील दोन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न, पालक किंवा सहकर्जदार याचां मालमत्तेचा तपशिल सादर करावा लागेल.
- सर्वसाधारणपणे भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. कर्ज घेण्यापूर्वी अर्जदाराने अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे.बँक ऑफ महाराष्ट्राकडून 1.5 लाख रुपयांच्या कर्जावर 1 वर्षाचा एमसीएलआर अधिक 2.25% व्याज आकारले जाते.
- छोट्या रकमेच्या कर्जावर प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही.
- परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकेकडून 10 लाख ते 20 लाखा दरम्यान शैक्षणिक कर्ज दिले जाते.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये
- बँकेकडून शैक्षणिक कर्जामध्ये अभ्यासक्रमाचे जितके शुल्क असेल तितके कर्ज मंजूर केले जाते. यात मार्जिन मनी ठेवले जात नाही.
- त्यामुळे विद्यार्थ्याला अभ्यासक्रमासासाठी अतिरिक्त शुल्काचा कोणताही भार उचलावा लागत नाही. बँकेकडून 100% अर्थसहाय्य मिळते.
- बड्या नावाजलेल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विना तारण बँकेकडून शैक्षणि कर्ज दिले जाते. त्यांना कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता कर्ज मिळते.
- मुलींना शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरात सवलत दिली जाते.
- अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी बँकेकडून शैक्षणिक कर्जाला तत्वत: मान्यता दिली जाते.
- जास्तीत जास्त 15 वर्ष कालावधीसाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते.